News

लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहे. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात उत्साह दिसून येत आहे. आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (Ganesh Chaturthi 2022)

Updated on 31 August, 2022 10:53 AM IST

लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहे. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात उत्साह दिसून येत आहे. आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (Ganesh Chaturthi 2022)

10 दिवस साजरा होणारा गणेशोत्सवही या दिवसापासून सुरु होत आहे. हिंदू धर्मात गणेशाला (Ganpati Festivals) प्रथम पूज्य देवता मानले जाते. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले आहेत.

शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थी: बुधवार, 31 ऑगस्ट 2022
गणपती मूर्ती स्थापनेचा मुहूर्त : 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.38 स्थापन करता येईल.
चंद्र दर्शन टाळणे : 30 ऑगस्ट दुपारी 03:33 ते रात्री 08:40 पर्यंत आहे.
गणेश विसर्जन तारीख: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022

गणपतीत 'या' लोकांचे सोनेरी दिवस सुरू होणार; कारण बाप्पाची असते विशेष कृपा

गणपती प्रतिष्ठापना विधी

१. प्रथम कपाळाला गंध लावून आचमन करावे.
२. देवापुढे देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी.
३. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.
४. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे.
५. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात.
६. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा.
७. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे.
८. नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे.
९. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे.

या शुभ मुहूर्तावर करा लाडक्या बाप्पाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी

१०. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वाहावे.
११. ताम्हणात 4 वेळा पाणी सोडावे.
१२. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात.
१३. गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात.
१४. प्रत्येक अवयवांवर अक्षता वाहाव्यात, विविध पत्री अर्पण कराव्यात.
१५. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे.
१६. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विडा अर्पण करावा.
१७. विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे.
१८. आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी.
१९. श्री गणेशास नमस्कार करावा, प्रार्थना करावी, एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.

English Summary: Grand arrival of Ganaraya, auspicious time and pooja rituals
Published on: 31 August 2022, 10:53 IST