News

यंदाचा उसाचा गाळप हंगाम खूपच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या सात महिन्यापासून उसाचा गाळप हंगाम सुरु आहे. तरी पण अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. त्याचबरोबर अनेक साखर कारखाने ऊस बिल देण्यास टाळाटाळ करत आहेत. ऊस बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार आहे.

Updated on 22 May, 2022 12:45 PM IST

यंदाचा उसाचा गाळप हंगाम खूपच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या सात महिन्यापासून उसाचा गाळप हंगाम सुरु आहे. तरी पण अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. त्याचबरोबर अनेक साखर कारखाने ऊस बिल देण्यास टाळाटाळ करत आहेत. ऊस बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार आहे.

ऊस बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांबाबत उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश मधील सहारनपूर विभागातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २ हजार कोटी रुपये थकीत असल्याचे समोर आले आहे. याबाबत उत्तर प्रदेश सरकारने गंभीर नोंद घेतली आहे.

शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे द्यावेत असे निर्देश दिले आहेत.

शेतकरी पुत्र गोपाल उगले यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार प्रदान

एका मीडिया प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेश राज्याचे ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहारनपूर विभागात २.३८ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक ८४५ कोटी रुपये शामली कारखान्याकडे आहे.

7th pay commission: मोठी बातमी! 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार, सरकारचा इशारा..

डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी सांगितले की, सहारनपूरच्या कारखान्याकडे ६५६ कोटी रुपये आणि मुझफ्फरनगरातील कारखान्यांकडे ५३७ कोटी रुपये थकीत आहेत. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलांचा आढावा घेतला जात आहे. बिले न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश राज्याचे ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी दिली.

दूध उत्पादन वाढवण्यासाठी अझोला उपयुक्त; लागवड तंत्रज्ञान आणि आश्चर्यजनक फायदे

English Summary: Government's big decision on sugarcane bill; Great relief to the farmers
Published on: 22 May 2022, 12:42 IST