आपण बघतो की अनेक ठिकाणी शेतकरी कष्ट करून शेतात चांगले उत्पादन मिळवतो, मात्र भटक्या जनावरांमुळे त्याला मोठा त्रास सहन करावा लागतो, आणि अनेकदा पिकांची नासधूस होते. आता याबाबत राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान सरकारने पिकांच्या संरक्षणासाठी 48 हजार रुपये देणार असल्याचे सांगितले आहे.
शेतकऱ्यांना शेताला कुंपण घालण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थान फसल सुरक्षा योजनेंतर्गत 1.25 कोटी मीटर वायरसाठी शेतकर्यांना 125 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना किमान 1.5 हेक्टर लागवडीयोग्य जमिनीसाठी जास्तीत जास्त 400 रनिंग मीटरपर्यंत कुंपण बांधण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाईल.
लहान शेतकऱ्यांना 48 हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. ३० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १० टक्के अतिरिक्त अनुदान रक्कम देण्यासाठी ३.६० कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करता येणार आहे.
यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ
अनेक दिवसांपासून याबाबत शेतकरी मागणी करत होते, अनेकांची पिके जनावरांनी पूर्णपणे उध्वस्त केली आहेत. यामुळे तोटा सहन करावा लागत होता. यामुळे आता पुढे याबाबत फायदा होणार आहे. शेतकरी आता अधिकचे उत्पादन मिळतील.
महत्वाच्या बातम्या;
दुचाकी चारचाकी खरेदी करायची असेल तर 1 जून आधी करा, किमतीमध्ये होणार मोठी वाढ
वाढलेले दुधाचे दर केंद्राला बघवेनात, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे दूध दरात कपात
अतिरिक्त उसावर आता प्रशासनही हतबल, आता ऊस फडातच राहणार? पहा आकडेवारी
Published on: 28 May 2022, 03:56 IST