राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मोदी सरकारवर जोरदार निशाना साधला. लोकसभेत मणिपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या विरोधात बोलत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या शेती, आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे.
'शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सरकारकडून सांगितलं जातंय, पण सरकारने कोणाचे उत्पन्न वाढले हे स्पष्ठ करावं', असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ९ वर्षांपूर्वी बहुत हुई मंहगाई की मार, अबकी बार... म्हणतं सत्तेवर आलेलं भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात महागाई झाली. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणारे सरकार कांदा, डाळ, तेल, दूधाला भाव देत नाही आणि परदेशातून आयात काय करताय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
राज्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कांदा पडून होता. त्यावेळी कांदा निर्यातीची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. जगभरात कांद्याचे उत्पादन घटले होते.
आता सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव, लक्ष्मी योजनेची झाली सुरुवात...
तेव्हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा पडून होता. त्यावेळीच कांदा बाहेर पाठवायला हवा होता. पण तसं झालं नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशभरातल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ करून टाका. हे १८.२ लाख कोटी कुणाचे माफ केले कुणास ठाऊक. यात शून्य किती लावलेत तेही कळतं नाही. एवढं माझं चांगलं गणित नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
जप्त केलेली वाळू घराकुलासाठी मोफत वाटप, महसूल विभागाचा निर्णय..
Published on: 09 August 2023, 10:23 IST