News

राज्यामध्ये पावसाने जे काही थैमान घातलंय त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हातात आलेले पीक या पावसाने हिरावून नेले. त्यानंतर या नुकसानग्रस्त पिकांची पंचनामे झाले व आता सरकारकडून अशा शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. परंतु या नुकसानभरपाईसाठी असणाऱ्या निकषांमध्ये जे शेतकरी बसत नाही परंतु नुकसान झाले आहे, तर अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होता.

Updated on 14 October, 2022 9:09 AM IST

राज्यामध्ये पावसाने जे काही थैमान घातलंय त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हातात आलेले पीक या पावसाने हिरावून नेले. त्यानंतर या नुकसानग्रस्त पिकांची पंचनामे झाले व आता सरकारकडून अशा शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. परंतु या नुकसानभरपाईसाठी असणाऱ्या निकषांमध्ये जे शेतकरी बसत नाही परंतु नुकसान झाले आहे, तर अशा अतिवृष्टीग्रस्त  शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होता.

नक्की वाचा:बारामतीत मुसळधार पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

परंतु याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून आता शासनाने निकषात न बसणाऱ्या  अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून मदत केली जाणार आहे व याबाबतचा शासन निर्णय जीआर देखील निघाला आहे.

याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चादेखील झाली होती व त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 काय आहे याबाबतचा शासन निर्णय?

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने 755 कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील 9 जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्यानुसार जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत झालेल्या पावसामुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे.

नक्की वाचा:Crop Loss: परतीच्या पावसाचे राज्यात थैमान! सोयाबीनसह, मूग, उडीद पिकं पाण्याखाली; शेतकरी अडचणीत

निकषात न बसणाऱ्या  अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतीत एसडीआरएफ जे काही निकष आहेत. त्यांच्या पलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भरीव लाभ मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. याबाबत नुकसान झाले आहे

परंतु निकषांमध्ये बसत नाही अशा शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी मदत मिळावी यासंबंधीचा प्रस्ताव औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे सादर केले होते व त्या अनुषंगाने सरकारने हा निर्णय घेतला होता. व या निर्णयाचा जीआर आता निघाला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.

नक्की वाचा:Insecticide: नाशिकमधील बनावट कीटकनाशकांचा 295 लिटरचा साठा जप्त

English Summary: goverment gr for compansation package crop damage in heavy rain in nine district in maharashtra
Published on: 14 October 2022, 09:09 IST