News

आजच्या काळात सर्वांनाच पैसा कमवून करोडपती व्हाव वाटते. यासाठी नवनवीन व्यवसाय टाकून किंवा नोकरी करून लोक पैसा कमविण्याच्या मागे धावत असताना पाहायला मिळतात. महत्वाचे म्हणजे आता धावपळ करण्याची गरज पडणार नाही.

Updated on 13 September, 2022 2:36 PM IST

आजच्या काळात सर्वांनाच पैसा कमवून करोडपती (millionaire) व्हाव वाटते. यासाठी नवनवीन व्यवसाय टाकून किंवा नोकरी करून लोक पैसा कमविण्याच्या मागे धावत असताना पाहायला मिळतात. महत्वाचे म्हणजे आता धावपळ करण्याची गरज पडणार नाही.

आता तुम्हाला गुगल करोडपती होण्याची संधी देणार आहे. यासाठी कंपनीनं बग बाऊंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे. यात जर तुम्ही ओपन सोर्स सॉफ्टवेअर Google OSS मध्ये त्रृटी शोधून दाखवली तर जवळपास २५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात तुम्ही जिंकू शकतात.

Google OSS मध्ये त्रृटी शोधू दाखवणाऱ्याला कंपनीकडून ३१,३३७ डॉलर म्हणजेच जवळपास २५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. गुगलकडून दिलं जाणारं बक्षीस हे १०० डॉलरपासून ३१,३३७ डॉलरपर्यंत असणार आहे. तुम्ही शोधून काढलेल्या चूक किती गंभीर स्वरुपाची आहे त्यावर तुम्हाला दिलं जाणाऱ्या बक्षीसाची रक्कम ठरणार आहे.

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

गुगलकडून 25 लाख रुपयांचा मिळणार रिवॉर्ड

सध्या गुगलनं ओपन सोर्स सॉफ्टवेअर (Source software) वल्नरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्राम लॉन्च करताना या बग बाऊंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे. गुगलनं दिलेल्या माहितीनुसार महत्वाची चूक शोधून काढणाऱ्याला रिवॉर्ड दिला जाणार आहे.

कंपनीनं यात टॉप अवॉर्ड सेंसिटिव्ह प्रोजेक्ट सारख्या Bazel, Angular, Golang, Protocol Buffers आणि Fuchsia मध्ये त्रृटी शोधून दाखवणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे. Google च्या OSS VRP नं प्रामुख्यानं सिक्युरिटी अडचणींवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये

यात सॉफ्टवेअर सप्लाय चेनला धोका पोहोचवणाऱ्या सुरक्षेत त्रृटींचा शोध घेतला जाणार आहे. डिझाइन फ्लो किंवा सिक्युरिटी फ्लोमुळे क्रेडेंशियल तसंच कमकुवत पासवर्ड हॅक (Poassword hack) केले जाऊ नयेत यासाठी कंपनीनं बग बाऊंटी हंटर्सना बग्ज शोधून काढण्यासाठी निमंत्रीत केलं आहे.

गुगलकडून जारी केलेल्या या प्रोजेक्टची (project) संपूर्ण माहिती आणि नियम काळजीपूर्वक वाचून घ्या, अशी सूचना कंपनीने केली आहे. त्यानंतर हॅकिंग करण्याचा प्रयत्न करण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे. यात एखादी त्रृटी आढळून आली तर त्याबाबतची माहिती द्यावी, असेही सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 
कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत
आनंदाची बातमी! आता गॅस सिलिंडर मिळणार फक्त 750 रुपयांमध्ये; आजच करा बुकिंग
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सूक्ष्म सिंचनासाठी तब्बल 666 कोटींचे अनुदान जाहीर

English Summary: Google giving opportunity earn 25 lakh rupees
Published on: 13 September 2022, 02:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)