उत्तराखंड मंत्रिमंडळाने गुरुवारी अंत्योदय कार्डधारकांना वर्षभरात तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. डेहराडून येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेतून अंत्योदय कुटुंबाना वर्षभरात ३ सिलिंडर मोफत दिले जातील. याचा सामान्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री धामी म्हणाले की, मंत्रिमंडळाने एलपीजी सिलिंडरवर ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाच्या खरेदीवर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २० रुपये बोनस दिला जाणार आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले की, "मी सांगितले ते केले! राज्यातील सर्व अंत्योदय कार्डधारकांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.
निवडणुकीपूर्वी व्हिजन पत्रात दिलेले आश्वासन पूर्ण केले असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. अंत्योदय कार्डधारकांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्याच्या धामी यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे., हा निर्णय ऐतिहासिक आणि कल्याणकारी सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत असल्याचे भाजपने म्हटले आहे.
भाजपचे राज्य माध्यम प्रभारी मनवीर सिंग चौहान यांनी आशा व्यक्त केली की, सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्यात दुर्बल घटकांना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतील. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे चौहान म्हणाले.
काँग्रेसने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे, काँग्रेसने म्हटले आहे की हे ३१ मे रोजी होणाऱ्या चंपावत पोटनिवडणुकांसाठी लागू असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे आणि या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री धामी आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
काय म्हणता! या गायीच्या सडाखाली दुधाचे भांडे धरताच गाय दूध द्यायला सुरवात करते,नेमकी कुठे आहे ही गाय?
Rainfall forecast : यंदाचा मान्सून वेळेआधी आणि विशेषतः सरासरीपेक्षा जास्त
Published on: 14 May 2022, 11:24 IST