शेती व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे देश विकासासाठी शेतीचा विकास(Development of agriculture)तितकाच गरजेचा आहे. शेती करताना शेतकरी पूर्वनियोजन आणि योग्य व्यवस्थापन करत असतो मात्र तरीही शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात. बऱ्याचदा शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या जगासमोर येत नाहीत. मात्र आता कृषी जागरण आपल्या शेतकरी बंधूना एक व्यासपीठ देत आहे.
कृषी जागरण (krushi jagran) शेतकऱ्यांना पत्रकार बनवण्याचा विचार करत आहे. कृषी जागरणच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतीच्या कामांची माहिती जगासमोर मांडू शकता. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवनवीन शोध आणण्यासाठी कृषी जागरण नेहमीच सक्रिय आहे. यावर्षी कृषी जागरणने २५ वा वर्धापन दिन यशस्वीपणे साजरा केला.
कृषी जागरणने ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कृषी समाजापर्यंत नवीनतम माहिती पोहोचवण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी केवळ प्रिंटद्वारेच नव्हे तर डिजिटल माध्यमांद्वारेही प्रयत्न केले आहेत.
आता कृषी जागरणने शेतकऱ्यांसाठी अजून एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. तो म्हणजे 'फार्मर द जर्नलिस्ट' (Farmer the Journalist). या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना योग्य मोबदलाही दिला जाईल.
"फार्मर द जर्नालिस्ट" म्हणजे काय?
पत्रकारितेत करिअर करू इच्छिणार्या शेतकर्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी येथे आहे. "फार्मर द जर्नलिस्ट" म्हणजे शेतकरी पत्रकार.
होय, तुम्ही शेतकरी असाल आणि शेती करत असाल. तर आम्ही तुम्हाला एक व्यासपीठ देत आहोत. ज्यात तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतीच्या कामांचीही माहिती देऊ शकता.
* जगाला कृषी क्षेत्रातील नवीनतम घडामोडींची जाणीव करून देणे
* देशाच्या कानाकोपऱ्यातील शेती आणि शेतकरी समुदायाकडून माहिती मिळवणे.
* डिजिटल प्लॅटफॉर्मवर कृषी क्षेत्रातील मनोरंजक उपक्रमांचे मैदानावरील व्हिडिओ सादर करणे.
आम्हाला काय हवे आहे:
1. उच्च दर्जाचा व्हिडीओ जो शेती विषयी नवीनतम माहिती दर्शवितो.
2. तुम्ही शेअर करत असलेल्या व्हिडिओचा कालावधी 3-5 मिनिटांचा असावा आणि तो स्वतंत्रपणे चित्रित केला गेला पाहिजे.
3. एकदा तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओ शेअर केल्यानंतर, तो व्हिडिओ वापरण्याचा एकमेव अधिकार कृषी जागरणला आहे.
विशेष सूचना:
आम्हाला शेतकर्यांकडून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत - शेतीची माहिती, शेतीच्या बातम्या, यशोगाथा, ते पत्रकार म्हणून दुसर्या शेतकर्यांच्या मुलाखती घेऊ शकतात - FTJ टीमने मंजुरी दिल्यानंतर आम्ही प्रति व्हिडिओ १०० रुपये देऊ.
आवश्यक माहिती
पूर्ण नाव-
राज्य-
जिल्हा-
ई - मेल आयडी-
तुमचा पूर्ण पत्ता आणि छायाचित्र-
शेतकऱ्यांसाठी "शेतकरी पत्रकार" चा काय फायदा आहे ?
*तुम्हीही कृषी पत्रकार होऊ शकता
* तुम्ही पाठवलेल्या बातम्या-व्हिडीओचा योग्य मोबदला दिला जाईल
* तुम्ही सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात करू शकता
* एकदा तुमची "शेतकरी पत्रकार" म्हणून निवड झाल्यावर तुम्हाला कृषी जागरण तर्फे ओळखपत्र, प्रमाणपत्र दिले जाईल.
स्वीकारलेले व्हिडिओ-न्यूज मोबदला तपशील
30 व्हिडिओ/ 30 स्पेशल रिपोर्ट : 5000 रु
20 व्हिडिओ / 20 स्पेशल रिपोर्ट : 2500 रुपये
10 व्हिडिओ/ 10 स्पेशल रिपोर्ट : 1000 रुपये
टीप: वरील मोबदला फक्त तुमच्या स्वीकृत व्हिडिओ बातम्यांसाठी आहे.
Published on: 28 July 2022, 04:46 IST