काही दिवसांपूर्वी साखर-उद्योग वैचारिक सेतु परिषदेला शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रातील तज्ञांनी हजेरी लावली होती. त्यात साखर उद्योगापुढील आव्हाने, निगडीत संबंधितांचे प्रश्न व त्यावरील उपाय योजना ह्या संदर्भातील १९ विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले मतप्रदर्शन केले. या परिषदेमध्ये वेळेअभावी ठोस असे निर्णय होऊ शकले नाहीत. म्हणून या विषयावर चर्चामंथन करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. यातील १५ तज्ञ् जणांची "टास्क फोर्स कोअर कमिटीत" नियुक्ती झाली आहे.
दर महिन्याला एक विषय घेऊन, चर्चा करून शिफारशी तयार करण्यात येणार आहे. या शिफारशी राज्य व केंद्राकडे पाठवण्यात येतील. काही महाराष्ट्रातील व गुजरातमधील कारखान्यांना अभ्यास भेटी सुद्धा देण्यात येणार असल्याची कमिटी कडून सांगण्यात येत आहे. समितीमध्ये साखर उद्योगासाठी योगदान देणारे तज्ञ, सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांचे एम.डी, इतर संलग्नीत संस्था तसेच शेतकरी संघटनेचे अभ्यासू कार्यकर्ते काम करणार आहेत.
तसेच इतर तज्ञांना गरजेनुसार, जसे इथेनॉल कन्सल्टंट, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA), वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), NFCSF, शेतकरी संघटनेचे नेते, ऊसतोड कामगार व कारखाना कर्मचारी प्रतिनिधी, मिटकॉन, प्राज कंपनी अधिकारी वगेरै ह्यांना विषयवार मांडणी व मार्गदर्शन करण्यासाठी (व्हिजिटिंग फॅकल्टी) आमंत्रीत केले जाणार आहे.
सतीश देशमुख (अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स, पुणे.), दत्ताराम रासकर (मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना), साहेबराव खामकर (संस्थापक-अध्यक्ष नवदीप सोशल फाउंडेशन व कार्यकारी संचालक प्रतापगड व थेऊर साखर कारखाना) विजय वाबळे (कार्यकारी संचालक), अनंत निकम (कार्यकारी संचालक) के.एन्.कापसे (कार्यकारी संचालक गुजरात), भारत तावरे (सरव्यवस्थापक), अजित चौगुले (कार्यकारी संचालक (WISMA), रावसाहेब अवताडे (शेतकरी अभ्यासक प्रतिनिधी) दिपक गायकवाड (कृषी अर्थ तज्ञ विश्लेषक) बाळासाहेब पठारे (राज्य ऊस नियंत्रण मंडळ सदस्य, शेतकरी अभ्यासक) असणार आहेत.
तसेच एस. एम. पवार, (DSTA, उस शास्त्रज्ञ), सीमा नरोडे (शेतकरी अभ्यासक प्रतिनिधी), टी. पी. निकम (कार्यकारी संचालक) तसेच संजीव देसाई (कार्यकारी संचालक), या लोकांची कमिटी २०२२-२३ काळासाठी कार्यान्वित केली आहे. सतीश देशमुख हे कमिटीचे समनव्यक म्हणून काम पहातील. यामुळे येणाऱ्या काळात यामधुन शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या;
जनावरांवरील उपचार आता गावातच, केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने झाला मोठा निर्णय
यंदा शेतकरी हतबल; या भागात पहिल्यांदा शेतकरी असल्याची खंत
21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा, या आंब्याची राज्यात चर्चा...
Published on: 19 May 2022, 04:24 IST