News

भारतातील शेतकरी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात. मात्र सध्या कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना निराश केले आहे. यानंतर सोयाबीन पिकाचे पाहिले तर सध्या सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत उडीद मात्र जोमात आहे. उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या चांगले दिवस सुरू झाले आहे.

Updated on 25 September, 2022 10:28 AM IST

भारतातील शेतकरी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात. मात्र सध्या कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना निराश केले आहे. यानंतर सोयाबीन पिकाचे पाहिले तर सध्या सोयाबीनला (soyabean) बऱ्यापैकी भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत उडीद मात्र जोमात आहे. उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या चांगले दिवस सुरू झाले आहे.

काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उडीद बाजारभाव विषयी आज आपण जाणून घेऊया. काल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) येथे उडदाला सर्वाधिक 10 हजार 100 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकरी खुश असलेले पाहायला मिळत आहेत.

आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाख रुपयांचा नफा

काल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) केवळ 15 क्विंटल काळ्या उडदाची आवक झाली होती. यासाठी किमान भाव 6200 तर कमाल 10 हजार 100 आणि सर्वसाधारण भाव 7150 इतका मिळाला. इतर पिकांच्या तुलनेत उडीदला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस सुरू होताना पाहायला मिळतील. 

पाऊस पुढचे काही दिवस विश्रांती घेणार; मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे करा असे नियोजन

आवक किती झाली याविषयी पाहिले तर, आज सर्वाधिक आवक ही दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती (Dairy Agricultural Produce Market Committee) याठिकाणी झाली आहे. ही आवक 1534 क्विंटल इतकी झाली आहे. यासाठी किमान भाव 6 हजार 300, कमाल भाव 7 हजार 845 आणि सर्वसाधारण भाव 7 हजार 75 रुपये इतका मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 
26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात यलो अलर्ट जारी
कुंडलीत चक्र आणि समुद्र योग असणारे लोक जगतात राजासारखे जीवन; तुमच्या कुंडलीत आहे?
डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोलसाठी 'या' फळाचे सेवन करावे; ठरेल फायद्याचे..

English Summary: Good news farmers Udida 10 thousand
Published on: 25 September 2022, 10:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)