News

शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी वाहतूक करणे देखील परवडत नाही. कांद्याच्या वाहतुकीचे दर देखील पडले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट व्हिएतनामला निर्यात केला.

Updated on 28 May, 2022 5:35 PM IST

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर खाली आहे आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी वाहतूक करणे देखील परवडत नाही. कांद्याच्या वाहतुकीचे दर देखील पडले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट व्हिएतनामला निर्यात केला. मात्र सर्वच शेतकऱ्यांना असे करणे शक्य नाही.

असे असताना आता वाढीव दरापेक्षा उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे हाच एक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. यामुळे आता वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. आता राहाता बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव हा चर्चेचा विषय बनला आहे. आतापर्यंत गोणीतून (Onion Arrival) कांद्याची आवक होत होती पण उत्पादन खर्च कमी होण्याच्या अनुशंगाने विक्री पध्दतीतच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपण बघितले असेल की, यापूर्वी गोणीतून कांदा मार्केटमध्ये दाखल केला जात होता, पण आता गोण्यातून नाही तर खुल्या पध्दतीने म्हणजेच सुट्टा कांदा वाहनांद्वारे आणला जात आहे. यामुळे खर्चाची बचत होत आहे. यामुळे गोणीवर होणारा खर्च वाचला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अशीच विक्री करण्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच यामध्ये खुल्या बाजारपेठेमुळे कांद्याची प्रत ठरवणेही सोपे होत आहे.

शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठलय? युरियाचे पाणी टाकल्याने चाळीतील कांदा नासला

आपण बघिलते असेल की अगोदर विक्रीसाठी गेलं की मोठ्या प्रमाणावर खर्च येत असे. गोणीचा खर्च, मजुरी, हमाली असा जास्तीचा खर्च करावा लागत होता. ज्या बाजार समित्यांमध्ये लुज कांदा लिलाव होतात त्या बाजार समितीत कांद्याचा वाहतुक खर्च अधिक असल्याने ते गणित परवडणारे नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना वीज बिल माफी!! अर्थसंकल्पात योगी सरकारची मोठी घोषणा..

थेट सुट्टा कांदा मार्केटमध्ये आणल्यामुळे प्रकति क्विंटल 100 रुपयांची शेतकऱ्यांची बचत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचाच पैसा वाचणार आहे. भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत खुल्या कांदा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव पडले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
आता कोल्हापूर सांगलीत पूर येणार नाही, अलमट्टी धरणाबाबत झाली महत्वपूर्ण बैठक
एकीचे बळ! मल्चिंग पेपरचे गाव, आधी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख, आता झाले बागायती
सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा! पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार, आता मिळणार ४ लाख..

English Summary: Good day to farmers for selling loose onions! Onion wanda will disappear
Published on: 28 May 2022, 05:35 IST