गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. एकामागून एक संकटे शेतकऱ्यांवर येत आहेत. काही पालेभाज्यांचे दर पडत आहेत. तर काहींचे दर वर आले आलेत. आता आता एका (Cilantro) कोथिंबिरीच्या जुडीमध्ये 10 किलो कांदा येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्या कोथिंबीरची जुडी 20 रुपयाला एक अशी स्थिती आहे. त्यामुळे कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन आल्याचे चित्र बाजारपेठेमध्ये पाहवयास मिळत आहे.
यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. शेती मालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत त्याला काय दर आहेत यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण ठरते. शिवाय आवक घटून मागणी वाढली की मालाच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. त्याप्रमाणेच कोथिंबीरची अवस्था आहे. मात्र हे दर किती दिवस टिकून राहणार हे सांगता येणार नाही.
उन्हाळी हंगामातील कोथिंबीरच्या उत्पादनात घट झाली आहे. अनेकांनी लावलेली कोथिंबीर जळून गेली. सध्या लग्नसराई जोमात सुरु असून कोथिंबीरच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे 5 रुपायाला मिळणारी कोथिंबीरची जुडी आता 20 रुपयांपर्यंत पोहचली आहे. अधिकच्या उन्हामुळे उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकरी सांगतात. तसेच शाळा सुरु झाल्यावर हे दर अजूनच वाढण्याची शक्यता आहे.
तीन महिन्यातील सर्वांधिक रुग्णांची नोंद! महाराष्ट्रात कोरोना वेगाने पसरतोय
आता सध्या अधिकचा दर मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा कोथिंबीरच्या लागवडीमध्ये मुळातच घट झाली होती. यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम म्हणून कोथिंबीरच्या जुडीला 20 रुपये आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेला कांदा मात्र दोन रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
महत्वाच्या बातम्या;
केंद्राप्रमाणेच राज्याचे निर्यात धोरण; निर्यातीवर दिला जाणार भर
अखेर काळजावर दगड ठेवत शेतकऱ्याने मारला उसावर रोटावेटर, ऊस तोडायला ४५ हजारांची मागणी
शेतकऱ्यांनो मिश्र मत्स्यव्यवसायामुळे उत्पन्नाचे दरवाजे उघडतील, होईल मोठा नफा
Published on: 31 May 2022, 05:16 IST