अहमदनगर शहरातील २५ वर्षे रखडलेला उड्डाण पूल भूमिपूजनवेळी सोन्याचे टिकाव,खोरे आणि चांदीच घमेले यासर्व वस्तूंचा भूमिपूजन वेळी वापरण्यात आलेले होते. यामुळे याची मोठी चर्चा झाली होती.
स्वर्गवासी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी विधिवत भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला होता. यामुळे अहमदनगरच्या विकासात मोठी भर पडणार होती.
भूमिपूजन वेळी तयार केलेले सोन्याचे टिकाव, खोरे आणि चांदीचे घमेले तयार केले होते ते आज कोणाच्या ताब्यात आहे? हे सोन चांदी आणले कोठून? त्यावेळीही केंद्रात आणि राज्यात भाजप सत्ता होती आणि आजही आहे. यामुळे आता हे सगळं गेलं कुठं असा सवाल अहमदनगर वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, शहर अध्यक्ष संजय जगताप, शहर महासचिव सचिन पाटील, शहर सचिव भाऊ साळवे, भिंगार अध्यक्ष जे. डि.शिरसाठ, योगेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी सांगण्यात आले की, जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या सोन्याचा नांगर पेशवाई काळात गायब करण्यात आला आहे, आज तीच विचारांची पेशवाई भाजप नावाने सत्तेत आले आहे.
याच सत्ताधारी पेशवाई भाजपच्या काळात या उड्डाण पुलासाठी वापरले गेलेले सोन्याचं टिकाव, खोर आणि चांदीचे घमेले गेले कुठे? २५ वर्षे रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण होणार आहे.
ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा दाखल
त्याचे श्रेय हे जनता २०२४ ला निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपातून मिळेलच. पूर्ण झालेला पुल हा सर्व सामान्य जनतेच्या कर रुपात भरलेल्या पैशातून उभारला आहे त्याचे कोणीही फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी टीका करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय, उत्तर प्रदेशला जास्त कोटा...
महाराष्ट्राची दिल्ली होणार? महाराष्ट्र डेंजर झोनकडे, धूलिकणांचे प्रदूषणामुळे दिला धोक्याचा इशारा
घोडगंगा सहकारी कारखान्यात राष्ट्रवादीच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना धक्का
Published on: 08 November 2022, 12:22 IST