News

निवडणुकीत कधी काय होईल सांगता येत नाही, सध्या उघडपणे अनेकजण मतदारांना पैसे वाटतात. आता पत्नी निवडणुकीला उभी असताना शिक्षक असलेल्या पतीने मतदाराना पैसे वाटप केले होते. मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संतापलेल्या उमेदवाराच्या पतीने मतदाराला पैसे परत द्या नाहीतर देवावर हात ठेऊन शपथ घ्या, अशी दमदाटी केली.

Updated on 13 January, 2023 11:03 AM IST

निवडणुकीत कधी काय होईल सांगता येत नाही, सध्या उघडपणे अनेकजण मतदारांना पैसे वाटतात. आता पत्नी निवडणुकीला उभी असताना शिक्षक असलेल्या पतीने मतदाराना पैसे वाटप केले होते. मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संतापलेल्या उमेदवाराच्या पतीने मतदाराला पैसे परत द्या नाहीतर देवावर हात ठेऊन शपथ घ्या, अशी दमदाटी केली.

यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. याचा विडिओ देखील व्हायरल झाला आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील महिला सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उभ्या होत्या. या साठी उमेदवाराचे पती जे पेशाने शिक्षक आहेत.

त्यांनी संपूर्ण मतदारासंघात उमेदवार पत्नीचा प्रचार केला. यासाठी त्यांनी पैसे देखील वाटले, असे करूनही मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाचा त्यांना मोठा धक्का बसला. या उमेदवार पत्नी आणि पतीने गावात फिरून तुम्ही पैसे घेतले मात्र मतदान केलं नाही.

काय सांगता! दिवसाला 33.8 लीटर दूध देणारी म्हैस; देशात ठरली नंबर १, अनेक पुरस्कारही नावावर...

असे अनेकांना म्हटले. याचा एक विडिओ व्हायरल झाला. यामध्ये पराभूत महिला उमेदवार व तिचा पती एका वृद्ध मतदाराशी वाद घालत आहेत. तुम्ही पैसे घेतले मात्र मतदान केलं नाही, असे म्हटले आहे.

शेजाऱ्यांनो वीजचोरीची माहिती द्या आणि मिळवा बक्षीस! महावितरणकडून अनोखी युक्ती

त्यांनी अनेकांशी वाद घातला. एक वृद्ध देवाची शपथ घेऊन तो तिथून निघून जातो, असं या व्हिडिओत दिसत आहे. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या;
या गावातील प्रत्येक शेतकरी करोडपती, प्रत्येकाकडे आलिशान घर महागडी वाहने, एका पिकाने बदलले नशीब
माती मधल्या कर्बचक्राचे कार्य
पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पादन, युवा शेतकऱ्याचा खडकाळ जमिनीमध्ये अभिनव प्रयोग..

English Summary: Give back money swear God, women lost election suffocating voters..
Published on: 13 January 2023, 10:58 IST