News

सध्या सांस्कृतिक कार्यक्रम असला की नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती असतेच असते. गौतमी आणि गर्दी हे ठरलेल समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच.

Updated on 28 April, 2023 10:06 AM IST

सध्या सांस्कृतिक कार्यक्रम असला की नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती असतेच असते. गौतमी आणि गर्दी हे ठरलेल समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच.

मुळशीत तर गौतमी चक्क बैलासमोर नाचली. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी लचकत, मुरडत नाचली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

सुशील हगवणे युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी भला मोठा स्टेज बांधला होता. असे असताना कार्यक्रमाला एकही माणूस उपस्थित नव्हता. गौतमी पाटील आली, नाचली पण तिच्यासमोर एकही माणूस प्रेक्षक म्हणून नव्हता असे पहिल्यांदाच घडलं.

शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज मिळणार..

त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकच पठ्ठ्या होत्या. तो म्हणजे बावऱ्या. बावऱ्या हा एक बैल आहे. या बावऱ्या बैलासमोर गौतमीने आपल्या लवाजम्यासह नृत्य केलं.

तब्बल तास दोन तास गौतमीने या बैलासमोर आपली अदाकारी पेश केली. समोर प्रेक्षक नसतानाही गौतमी आणि तिचे सहकलाकार तितक्याच जोशात आणि जल्लोषात नृत्य करत होते.

खडकवासलातून एक मे पासून दुसरे उन्हाळी आवर्तन, शेतकऱ्यांना फायदा होणार..

मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती.

हा आहे भारतातील सर्वात महाग ट्रॅक्टर, जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये
आता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार कृषी अभ्यासक्रम
आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती उतरल्या, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?

English Summary: Gautami Patil's dance in front of Bavrya Baila, not a single person is present at the event...
Published on: 28 April 2023, 10:06 IST