News

सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडर (gas cylinder) धारकांच्या खात्यात सबसिडी जमा होणार आहे. एलपीजी (LPG) धारकांना प्रती सिलिंडर 72.57 रुपये सबसिडी दिली जात आहे.

Updated on 23 August, 2022 2:34 PM IST

सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडर (gas cylinder) धारकांच्या खात्यात सबसिडी जमा होणार आहे. एलपीजी (LPG) धारकांना प्रती सिलिंडर 72.57 रुपये सबसिडी दिली जात आहे.

परंतु ग्राहकांना वेगवेगळी सबसिडी दिली जात आहे. आपण पाहिले तर अनेकांना 158.52 रुपये म्हणजेच 237.78 रुपये अनुदान मिळत आहे. मात्र, सबसिडी तुमच्या खात्यावर (Account) आली की नाही हेब कसे तपासणार? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Soybean Market Price: सोयाबीन बाजारभावात मोठा बदल; जाणून घ्या सोयाबीचे दर

सबसिडी अशी तपासा

सर्वप्रथम http://www.mylpg.in उघडा. पुढे तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या (Gas companies) गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल. येथे तुम्ही तुमच्या सेवा (Service) पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.

यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची असेल. त्यानंतर वरच्या उजवीकडे साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर क्लिक करा. तुम्ही तुमचा आयडी येथे आधीच तयार केला असेल तर साइन इन करा.

Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत

किंवा तुमच्याकडे आयडी नसेल तर नवीन वापरकर्त्यावर टॅप करा आणि वेबसाइटवर लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या समोर एक विंडो उघडेल, उजवीकडे View Cylinder Booking History वर क्लिक करा.

तुम्हाला कोणत्या सिलेंडरवर किती सबसिडी दिली आहे? ते याठिकाणी तुम्ही पाहू शकाल. तसेच सबसिडी कधी दिली जाते? हे ही तुम्हाला दिसेल.

तसेच तुम्ही गॅस बुक केला असेल तर आणि तुम्हाला अनुदानाचे पैसे मिळाले नसतील तर फीडबॅक बटणावर क्लिक करा. याठिकाणी सबसिडीचे पैसे न मिळाल्याची तक्रारही करू शकता. याशिवाय, तुम्ही टोल फ्री क्रमांक 18002333555 यावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

महत्वाच्या बातम्या 
Gold Bond Scheme: सरकारच्या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा; वाचा सविस्तर
Agriculture Without Soil: मातीविना शेती करता येणार 'या' तंत्राने; शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार
काय सांगता! आता हवेतही घेता येणार बटाट्याचे उत्पादन; एरोपोनिक तंत्रज्ञानाची कमाल

English Summary: gas cylinder holders LPG subsidy mittey amount
Published on: 23 August 2022, 02:27 IST