यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे खताचा तुटवडा भासणार असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे ऐन कामाच्या वेळी खताचा तुटवडा पडला तर त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. असे असताना आता वाशीम जिल्ह्यात (Fertilizer Stock) खताचा साठा नसल्याने यंदा खरिपाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच शेतकरी संघटनेनेही आक्रमकता दाखवत खताच्या पुरवठ्यासाठी आवाज उठविला होता.
असे असताना जिल्ह्यातील ही परस्थिती पाहता कृषी विभागाने डीएपी चे 1 हजार 200 क्विंटल खतांची रॅंक उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. डीएपी खताच्या पोत्याला चक्क फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. त्यामुळे खरिपासाठी रासायनिक खत किती महत्वाचे झाले आहे. हे यावरून दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असतो.
कृषी विभागाने योग्य वेळी पुरवठा केला आता कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यामुळे आता चांगला पाऊस आणि चांगला बाजरभाव मिळाला तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. तसेच मोदी सरकारने रासायनिक खतावर अनुदान वाढवले आहे, यामुळे आर्थिक झळ ही शेतकऱ्यांना बसली नाही. भविष्यात खताचा होणारा पुरवठा आणि कृषी विभागाकडून केले जाणारे नियोजन यावर सगळे गणित अवलंबून आहे.
मोठी बातमी! पेट्रोल डिझेलनंतर आता स्टील आणि सिमेंटचे दरही केले कमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय...
कृषी विभागाने खरिपाच्या तोंडावरच डीएपीचा पुरवठा केल्याने काही दिवस का होईना प्रश्न मार्गी लागला आहे. कृषी विभागाने पुढाकार घेऊन 1 हजार 200 क्विंटल खत पुरवठा केला आहे. डीएपी या रासायनिक खताचा पुरवठा होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून डी ए पी खतांच्या पोत्याला हार घालून स्वागत केले. यामुळे याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
दोन वर्षानंतर टोमॅटोने मालामाल केल्याने शेतकऱ्याने टोमॅटोच्या रोपाची काढली मिरवणूक
पेट्रोल, डिझेल होणार २० रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारकडून दिलासा मिळणार
'भीक मागून कृषिमंत्र्यांना पैसे देऊ पण कांद्याला रास्तच भाव घेऊ'
Published on: 07 June 2022, 03:27 IST