गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवून दिला होता. यामुळे आता यावर्षी देखील आपला ऊस जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असताना आता मंत्री समितीच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या हंगामात २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे.
यावर्षी देखील उसाचे क्षेत्र वाढले आहे, साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
भीमाशंकर साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
दरम्यान, यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जाण्यासाठी देखील यंत्रणा राबवण्यात येणार आहे.
इथेनॉल निर्मितीमध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. पुढील वर्षी ३२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. यामुळे महाराष्ट्राचा आलेख हा चढता दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या;
नाफेडचा कांदा बाजारात येणार? शेतकऱ्यांची चिंता वाढली, दुष्काळात तेरावा महिना येण्याची शक्यता
Solar Pump Yojana: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट, असा करा अर्ज
शेतकऱ्यांपुढे नवे संकट, घाेणस अळीचा प्रभाव वाढला, चावा घेतल्याने अनेक शेतकरी रुग्णालयात
Published on: 19 September 2022, 05:12 IST