News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उसाच्या वजनावरून राजकीय वातावरण तापले आहे, अनेक कारखान्यात उसाचे वजन करताना काटामारी केली जाते, असा आरोप केला जात आहे. यासाठी राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. राज्यातील साखर कारखान्याकडून होत असलेल्या काटामारीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ७ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता.

Updated on 14 November, 2022 11:01 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उसाच्या वजनावरून राजकीय वातावरण तापले आहे, अनेक कारखान्यात उसाचे वजन करताना काटामारी केली जाते, असा आरोप केला जात आहे. यासाठी राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. राज्यातील साखर कारखान्याकडून होत असलेल्या काटामारीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ७ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता.

यावेळी या मोर्चाची दखल घेवून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खाजगी वजन काटे वैद्यामापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित केले असल्याने खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरण्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी माहिती दिली आहे.

जर कारखान्याच्या वजन काट्यात तफावत आढळल्यास साखर आयुक्तालयाने दिलेल्या नमुन्याप्रमाणे संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालक यांचेकडे तक्रार देण्यात यावी. असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. दरवर्षी त्यांना ऊसदरासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

8 दिवसांपासून अजित पवार कुठे होते? अजित पवारांनी सांगितले कारण...

असे असताना साखर कारखानदारांकडून सर्रास काटामारी होते. एका वाहनामागे सुमारे दोन ते अडीच टनांची काटामारी हमखास होते. किमान ३१०० रुपयांचा ऊसदर गृहीत धरल्यास या काटामारीतून कारखानदार वर्षाकाठी सुमारे चार हजार ५८१ कोटी रुपयांचा दरोडा टाकतात, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केली आहे.

गुजरात निवडणुकीचा देशाला फायदा? पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता..

शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. तसेच विनापावती साखरेची विक्री करून सरकारच्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या जीएसटीलाही चुना लावतात. याबाबत शासनाने साखर कारखान्यांच्या गोदामावर अचानक छापे टाकावेत आणि बेहिशेबी साखर किती आहे तपासावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच एफआरपीच्या मुद्द्यावर आता आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर
पुन्हा पाऊस! पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता..
काश्मीरचे सफरचंद आता पुण्यात पिकतय, भोरच्या शेतकऱ्याची कमाल..

English Summary: Front weight sugarcane brought weighing private weighing fork accepted
Published on: 14 November 2022, 11:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)