अधिक एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आहे. आजपासून बऱ्याच गोष्टींमध्ये नवे बदल करण्यात आले असून त्या बदलांचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर पडण्याची दाट शक्यता आहे.
आपण पाहतच आहे की पेट्रोल आणि डिझेल या दरांमध्ये गेल्या सात-आठ दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही तर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर च्या किमती मध्ये देखील वाढ होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडू शकते.
सीएनजी आजपासून स्वस्त
राज्यांमध्ये आज एक एप्रिलपासून सीएनजी गॅस स्वस्त झाला आहे. सीएनजी वरील व्हॅट 10.5 टक्क्यांनी कमी केल्याने सीएनजी किलोला सरासरी सात ते आठ रुपयांनी स्वस्त होणार आहे. अगोदर सीएनजीवर 13.5 टक्के मूल्यवर्धित कर आकारण्यात येत होता आता तो तीन टक्के आकारला जाणार आहे. त्यामुळे सीएनजी स्वस्त होईल.
महावितरणचा वीज दरात कपात म्हणजेच मिळेल स्वस्त
घरगुती वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून महावितरणने त्यांची वीज दर दोन टक्के तर टाटाची वीजदर चार टक्क्यांनी कमी होणार आहेत. अदानीच्या वीज दरात वाढ होणार असून बेस्टचे वीजदर स्थिर असणार आहेत.
औषधे महाग होणार
आज पासून पेन किलर, अँटिबायोटिक्स आणि अँटिव्हायरस औषधांचे इतर अत्यावश्यक औषधांचा किमती वाढणार आहेत. सरकारने शेडूल औषधांसाठी दहा टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली असल्याने 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत.
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक न केल्यास दंड
आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास आता दंड भरावा लागणार आहे. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड आकारण्यात येईल. त्यानंतर जर उशीर केला तर दंडाची रक्कम एक हजार रुपये पर्यंत जाईल. आणि महत्वाचे म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह केले जाईल.
आजपासून मास्क पासून सुटका
आता मास्क घालण्याची ऐच्छिक करण्यात आले असून तुम्ही मास्क न घातल्याने दंड केला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालने, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात स्वच्छ करणे हे मार्गदर्शक तत्वे ठेवण्यात आली आहेत परंतु कोणताही नियम व्यापकपणे अनिवार्य ठेवण्यात आलेला नाही. एवढेच नाही तर गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोनाविषाणू च्या संदर्भात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा एक एप्रिलपासून संपत आहे. म्हणून या अंतर्गत येणारे कोरोना ची कॉलर ट्यून देखील बंद करण्यात येणार आहे.
Published on: 01 April 2022, 09:47 IST