News

विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा गोठ्यात तडफडून मृत्यू झाला. यामुळे कागल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील साके या गावात काही अज्ञातांनी शेतात असणाऱ्या वैरणीवर विषारी औषध फवारले होते.

Updated on 18 July, 2023 11:12 AM IST

विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा गोठ्यात तडफडून मृत्यू झाला. यामुळे कागल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील साके या गावात काही अज्ञातांनी शेतात असणाऱ्या वैरणीवर विषारी औषध फवारले होते.

तानाजी सातापा गवसे व सुवर्णा तानाजी गवसे या शेतकरी कुंटुंबाने जीवापाड जपलेल्या गायींच्या मृत्यू झाला. याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील केली जात आहे.

साके येथे चार अज्ञातांकडून वीस गुंठ्यातील झेंडूफूल शेतीवर विषारी औषध फवारण्यात आले होते. यामुळे बाग करपून गेली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी येथील तानाजी गवसे यांच्या कागल व्हनाळी रोडवर असणार्‍या भट्टाचा मळा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतातील वैरणीवर अज्ञात व्यक्तीने विषारी औषध फवारले.

पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त ४ टक्के व्याजाने कर्ज, असा करा अर्ज...

दरम्यान, याबाबत गवसे यांना औषध फवारणी केली असल्याची कल्पना नसल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे ही वैरण आणून गवसे यांनी आपल्या गायींना घातली. गायींनी वैरण खाल्ल्यानंतर सुमारे तासाभराने चारही गायी तडफडू लागल्या.

टोमॅटोचे भाव पडले त्यावेळी कुठं गेले होते आता ओरडणारे...?

याबाबत गवसे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरीत डॉक्टरांना बोलावले. पण उपचारा दरम्यान या गायींचा मृत्यू झाला. या घटनेने सर्व कुंटुंब हादरून गेले आहे.

कोंबडा मिळेल का कोंबडा! एक किलो कोंबड्याचा भाव 800 ते 900 रुपये...
कौतुकास्पद! महिला बचत गटाने उभारला सामूहिक गोठा..
कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे यांचा कामांचा धडाका! शेतकऱ्यांसाठी घेतले अनेक निर्णय..

English Summary: Four cows died in cowshed due to consumption of poison by cows.
Published on: 18 July 2023, 11:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)