News

दिल्ली जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब देखील जिंकला. यामुळे आता देशात केजरीवाल यांची लाट वाढत चालली आहे. आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, ज्यासाठी सर्व पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे तयारी सुरू केली आहे. यामुळे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Updated on 22 August, 2022 12:30 PM IST

दिल्ली जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब देखील जिंकला. यामुळे आता देशात केजरीवाल यांची लाट वाढत चालली आहे. आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, ज्यासाठी सर्व पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे तयारी सुरू केली आहे. यामुळे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

असे असताना आता केजरीवाल यांनी महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले आहे. आता आम आदमी पक्षात काही महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश होत आहेत. आज महाराष्ट्रातील २ बड्या नेत्यांनी 'आप'चा झाडू हातात घेतला. भाजपचे माजी खासदार, बंजारा ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनीही आज आम आदमी पक्षाचा झाडू हाती घेतला.

त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे नेते, माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी आज 'आप'मध्ये प्रवेश केला.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. हरिभाऊ राठोड हे भारतीय जनता पक्षातले एकेकाळचे महत्त्वाचे नाव आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

2024 मध्ये विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अखिलेश यादव यांनी सांगितले महाराष्ट्रातील 'या' नेत्याचे नाव..

ते ओबीसी नेते असल्याने गोपीनाथ मुंडे यांच्या ते निकटवर्तीयांपैकी एक होते. २००४ ते २००८ या काळात हरिभाऊ भाजपकडून खासदार होते. पण काही कारणांनी भाजपने त्यांच्यालर निलंबनाची कारवाई केली. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आता त्यांनी आम आदमीचा झेंडा हाती घेतला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून वंजारी यांची ओळख होती.

चोरट्यांचे आगळंवेगळं धाडस! शेतकऱ्यांनो आता मोटर नाही तर चालू विद्युत डीपी'च गेलीय चोरीला..

त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी महाराष्ट्रभर वंचितच्या उमेदवारांचा प्रचार केला. मात्र काही कारणाने ते बाजूला पडले, अखेर त्यांनी आता आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. दरम्यान, आता आम आदमी राज्यात तयारीने निवडणूक लढवणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन होणार? मोदी सरकारचा निर्णय
टोळ्यांनी फसवलं!! ऊसतोड कामगारांकडून तब्बल 39 कोटी रुपयांची फसवणूक, धक्कादायक आकडेवारी आली समोर
500 दिवस घरापासून दूर, 108 किलो वजन केले कमी, सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलाने केलं तरी काय..

English Summary: Former BJP MP from Maharashtra joins AAP, Kejriwal's Mission Maharashtra begins
Published on: 22 August 2022, 12:30 IST