सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व रावेर येथे उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, राज्यात जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. नम्रता चौधरी वरणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी येत असताना त्यांना उन्हाचा तडाखा बसला. उलट्या व मळमळ झाल्यामुळे त्या घरातच बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले.
यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अवकाळी पावसामुळे काही दिवस उष्णता कमी झाली मात्र पून्हा एकदा आता उष्णता वाढू लागली आहे. पुण्यात तापमान चाळीशीच्या वर गेले आहे.
कृषी जागरणकडून करिअर सक्षमीकरणासाठी 'विंग्स टू करिअर' उपक्रम सुरू
जळगावमध्ये काल सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बदल होत आहे. याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, राजेंद्र पवार यांचा पुढाकार
यामुळे आता पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. अनेक ठिकाणी पारा ४० च्या वर गेला आहे. पाऊस लांबला तर यामध्ये अजूनच वाढ होईल. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
इस्त्रायलला शेती अभ्यासाचे आमिष दाखवून पुण्यातील संस्थेचा शेतकऱ्यांना 51 लाखाचा गंडा
सुधारित तंत्राचे हळद लागवडीचे नियोजन
राज्यात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट
Published on: 15 May 2023, 09:41 IST