News

शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे यासाठी मोदी सरकारने काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये ३ वर्षासाठी हेक्टरी १२ हजार २०० रुपये मदत केली जाणार आहे. त्या अनुशंगाने देशभरात ४ लाख हेक्टरवर हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला जाणार आहे.

Updated on 29 March, 2022 4:44 PM IST

मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतजमिनीचे आणि पर्यायाने मानवाचेही आरोग्य बिघडत जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे यासाठी मोदी सरकारने काही निर्णय घेतले आहेत.

तसेच नैसर्गिक शेतीबरोबरच पारंपरिक देशी पध्दतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याकरिता केंद्राच्या माध्यमातून योजनाही राबवली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व कृत्रिम व रासायनिक खते वगळण्यावर भर देण्यात आला आहे. हे भविष्यात खूप घातक ठरणार आहे. यामुळे बायोमास मल्चिंग, शेण-मूत्र फॉर्म्युलेशनच्या वापरास प्रोत्साहन देण्यात आले आहे. यासाठी सरकार मदत देखील करणार आहे.

यामध्ये ३ वर्षासाठी हेक्टरी १२ हजार २०० रुपये मदत केली जाणार आहे. त्या अनुशंगाने देशभरात ४ लाख हेक्टरवर हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला जाणार आहे. केंद्र सरकारने भारतीय नैसर्गिक प्रणाली ही योजनाही सुरु केली असून यंदा देशात ४ लाख हेक्टर क्षेत्रफळावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला जाणार आहे.
याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माहिती दिली आहे.

यामध्ये देशभरातील ८ राज्यांसाठी ४९ कोटी ९९ लाख रुपये दिले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नैसर्गिक शेतीबरोबरच पारंपरिक देशी पध्दतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याकरिता केंद्राच्या माध्यमातून योजनाही राबवली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व कृत्रिम व रासायनिक खते वगळण्यावर भर देण्यात आला असून बायोमास मल्चिंग, शेण-मूत्र फॉर्म्युलेशनच्या वापरास प्रोत्साहन देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! शेती विकत घेण्यासाठी सरकार देणार 50 टक्के अनुदान, असा घ्या लाभ
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उन्हाळ्यातील पाण्याबाबत अजित पवारांचा मोठा निर्णय..
शेतकऱ्यांनो विक्रमी दराने झालीय सुरुवात, आता रमजानमध्ये कलिंगडातून करा लाखोंची कमाई

English Summary: financial help from Modi government on natural agriculture, know ..
Published on: 29 March 2022, 04:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)