गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. असे असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 50 हजारांची घोषणा केली होती. आता शिंदे सरकारने हा निर्णय कायम ठेवत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना अतिवृष्टी, पूरग्रस्तांचादेखील समावेश राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यामुळे तिजोरीवर मोठा भार येणार आहे.
मोठी बातमी: गावात बालविवाह झाला तर सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक होणार निलबिंत
दरम्यान, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत राजू शेट्टी यांनी मागणी केली होती.
तसेच या योजनेचा लाभ राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहे. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसालासुद्धा हा लाभ मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा
प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. हा लाभ घेताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या:
Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद
Post Office Scheme: भारीच की! पोस्टाने आणली 'ही' जबरदस्त परतावा योजना; घ्या आजच लाभ
Published on: 28 July 2022, 09:30 IST