यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने अनेकांची चिंता वाढली होती. असे असताना आता राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. कोकणात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे.
विदर्भात जोरदार कोसळणाऱ्या वरुणराजाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हजेरी लावली आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता खरिपाच्या पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यासाठी शेतकऱ्यांची तयारी झाली असून आता लवकरच पेरण्यांची कामे सुरू होणार आहेत.
जूनच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीसह पेरण्यांची कामे खोळंबली होती. मात्र मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत झाल्यानंतर दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.
सध्या अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली.
दूध दर आंदोलन पेटले! सांगोल्यात रास्ता रोको, शेतकरी अडचणीत..
तसेच दुपारी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी आल्या.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यांत कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी पुणे जिल्ह्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता, कृषी विभागाचा नियंत्रणासाठी पुढाकार..
1 जुलैपासून शेतकरी जनजागृती अभियान, राजू शेट्टी करणार रायगडावर मोठी घोषणा
Published on: 26 June 2023, 11:06 IST