News

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करत आहे. यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले असून प्रत्येकाने आपल्या जवळचा एक तरी व्यक्ती यामध्ये गमावला आहे. असे असताना आत एक बातमी समोर आली आहे. नियमित उपवास (Fast) करणाऱ्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता कमी असते असे आता एका संशोधनातून (Research) समोर आले आहे. नियमित उपास-तापास करणाऱ्या लोकांना विविध प्रकारे लाभ मिळतात.

Updated on 12 July, 2022 12:48 PM IST

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करत आहे. यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले असून प्रत्येकाने आपल्या जवळचा एक तरी व्यक्ती यामध्ये गमावला आहे. असे असताना आत एक बातमी समोर आली आहे. नियमित उपवास (Fast) करणाऱ्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता कमी असते असे आता एका संशोधनातून (Research) समोर आले आहे. नियमित उपास-तापास करणाऱ्या लोकांना विविध प्रकारे लाभ मिळतात.

यामुळे आता चर्चा सुरु सुरु झाली आहे, यावर अजूनही प्रभावी असे औषध आले नाही. यामुळे आता या संशोधनाचा यावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अन्नपचन व्यवस्थित होते, आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने आपल्या जठर आणि पचनक्रियेतील स्नायूंना आराम मिळतो, भरपूर भूक लागते, आता मात्र थेट कोरोनाशी संबध आल्याने याची चर्चा सुरु आहे.

नियमित उपवास करणाऱ्या लोकांना मधूमेह आणि हृद्यविकाराचा (Heart Attack) धोका कमी असतो, असे निरीक्षणात आले आहे. याबाबत बीएमजे, न्यूट्रिशन, प्रीव्हेन्शन अँड हेल्थ या साप्ताहिकात हा आभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आला आहे. यामुळे उपवास हा कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकजण उपवास करुन फक्त पाणी पितात त्यांना रुग्णालयात नेण्याचा किंवा मृत्यूचा धोका उपवास न करणाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे.

काय सांगता! शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी

याबाबत आम्ही उपवासाच्या अधिक फायद्यांचा शोध घेत आहोत. यामध्ये मार्च 2020 आणि फेब्रुवारी 2021 या काळात जेव्हा लस उपलब्ध नव्हती तेव्हा 205 कोरोनाग्रस्तांचे निरीक्षण करुन हे निष्कर्ष काढले. या 205 पैकी 73 जण महिन्यातून किमान एकदा उपवास करतात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आल्याचे अमेरीकन संशोधक बेंजामिन होर्ने यांनी सांगितले.

या गोष्टी कधीही चहासोबत खाऊ नका, आरोग्यासाठी आहे खूपच धोकादायक

तसेच उपवासामुळे शरीरातील खराब निकामी झालेल्या पेशी नष्ट होतात. होर्नेंच्या मते हे फायदे वर्षानुवर्षे उपवास करणाऱ्या लोकांनाच मिळतात. उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. कारण उपवास कोरोना प्रतिबंधक लस नाही, असेही होर्ने म्हणाले. यामुळे प्रत्येकाच्या शरीरावर या गोष्टी अवलंबून आहेत.

महत्वाच्या बातम्या;
राज्यात वाढतोय रेशील उद्योग, शेतकऱ्यांना 3 लाखांपेक्षा जास्तीचे अनुदान
मोठी बातमी! विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका चार महिन्यांचा तुरुंगवास
जनधन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार 3 हजार रुपय

English Summary: Fasting does not cause corona, important information from research
Published on: 12 July 2022, 12:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)