News

शेती करताना पिकांची निवड आणि पुरेशा उत्पन्नासाठी खतांची निवड फार महत्वाचा भाग असतो. शिवाय या निवडीवर शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असते. आता पुणे विभागीय खरीप हंगाम आढावा बैठकीत खरीप हंगामासाठी केंद्राने वेळेवर रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे.

Updated on 17 May, 2022 11:06 AM IST

शेती करताना पिकांची निवड आणि पुरेशा उत्पन्नासाठी खतांची निवड फार महत्वाचा भाग असतो. शिवाय या निवडीवर शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे पीक किती जोमात असले तरी खताची उपलब्धता होऊन वेळेत पिकाला खत देणे आवश्यक असते. मात्र, पिकांच्या ऐन बहरात खतांचा तुटवडा झाल्याचे दिसून आले आहे.

असे असताना मात्र आता पुणे विभागीय खरीप हंगाम आढावा बैठकीत खरीप हंगामासाठी केंद्राने वेळेवर रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. ही खते जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या रेक पॉईंटवर त्या, त्या जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली. शिवाय हा खतांचा साठा संबंद्धीत जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यात उचलण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने खरीप हंगामासाठी केंद्राकडे ५२ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांच्या मागणी पैकी केंद्र सरकारने ४५ लाख मेट्रिक टन इतकी खते उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे खरीपासाठी खतांचा तुटवडा येणार नसल्याचे पवार म्हणाले. शेतकऱ्यांनी 'विकेल ते पिकेल' या योजनेअंतर्गत मागणी असलेल्या पिकांना प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. बीडच्या धर्तीवर पीक विमा योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात आली असून पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घेण्यात येईल यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे ते म्हणाले.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक खते व बियाणे गरजेप्रमाणे मिळेल याची दक्षता घ्यावी. खते व यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुण्यात पुणे विभागाची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली.

यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
'आज आरती केली येणाऱ्या काळात भरणे मामांच्या नावानं शांती करणार'
लवकरचा पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना
दुग्धव्यवसायासाठी डेअरी फार्मचे नियम आहेत फायदेशीर, जाणून घ्या...

English Summary: Farmers' worries over fertilizers allayed, Ajit Pawar's big decision in kharif season review meeting
Published on: 17 May 2022, 11:06 IST