शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि हवामानाचा अंदाज समजला तर त्यांना याचा चांगला फायदा होतो. अनेक गोष्टींचे नियोजन करून त्यांना तशी पिके देखील घेता येतात. असे असताना आता याबाबत एक निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची कामे सुरु झाली आहेत. मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता मान्सूनच्या संदर्भातील माहितीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणारे आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या शेतकरी बांधवांना हवामानाच्या अंदाजासंदर्भात विषेश मार्गदर्शनासाठी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागानं पुढाकार घेतला आहे. कृषी विभाग भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून शेतकरी बांधवांना प्रत्येक शुक्रवारी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पावसाचा आणि बदलत्या हवामानाचा अंदाज येईल.
राज्यात सहकारी साखर कारखान्यांकडून 41 टक्के साखर निर्यात, महाराष्ट्र राज्याला असाही फायदा
यामध्ये प्रत्येक शुक्रवारी शेतकऱ्यांना साप्ताहिक हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे. कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील देण्यात येणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. याचा शेतकऱ्यांचा फायदा होईल. सध्या शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरु आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन महत्वाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरणीबाबत वाचा तज्ञांचा सल्ला, वाढेल उत्पादन
दर शुक्रवारी हा U tube वरती लाइव दिसेल, जयाचा फायदा बळीराजाला नक्की होणार. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..
मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय
थायलंडमध्ये गांज्याच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता, मान्यता देणारा पहिलाच देश
Published on: 11 June 2022, 12:08 IST