News

राज्यात खतांच्या खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना आपली जात (Farmer Cast For Fertilizer) सांगावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमध्ये खत खरेदीसाठी ई-पॉसमधील (Fertilizer E-Pos) सॉफ्टवेअरमध्ये खरेदीदार शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.

Updated on 10 March, 2023 1:05 PM IST

राज्यात खतांच्या खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना आपली जात (Farmer Cast For Fertilizer) सांगावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमध्ये खत खरेदीसाठी ई-पॉसमधील (Fertilizer E-Pos) सॉफ्टवेअरमध्ये खरेदीदार शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.

रासायनिक खतांसाठी सरकार खत कंपन्यांना अनुदान देते. या अनुदानासाठी ई-पॉस यंत्रणा वापरली जाते. खत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आपली माहिती ई-पॉस मशिनमध्ये भरावी लागते. गेल्या तीन चार दिवसांपूर्वी ई-पॉस मशिनमधील ३.२ नावाचे सॉफ्टवेअर अद्ययावत (अपडेट) करण्यात आले आहे.

ज्यामुळे खत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती घेवून त्यानुसार शेतकऱ्यांची वर्गवारी करण्यात येते. यापूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांच्या जातीची माहिती विचारली जात नव्हती. परंतु मशिनमधील नव्या अपडेटमध्ये जात विचारली जात असल्याचे खत विक्रेते सांगत आहेत.

शिंदे सरकारची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कांद्यासह अनेक शेतमालांच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता रासायनिक खतांच्या खेरदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगावी लागत आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

शेतकऱ्यांनो गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिक काढणीला आली असतील तर घाई करा, पुन्हा पावसाची शक्यता

या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचे म्हणत निषेध केला. यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. ते म्हणाले, यामुळे समाजात जातीभेद वाढेल. खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल, असं मला वाटत नाही. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पमार्फत जागतिक महिला दिवस साजरा
शेततळे योजनेचा विस्तार, जलयुक्त शिवारला संजीवनी, अर्थसंकल्प जाणून घ्या
'अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा'

English Summary: Farmers will now have to be told to buy fertilizers, the strange decision has fueled discussions.
Published on: 10 March 2023, 01:05 IST