मागील दोन दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे.
विदर्भसह अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उर्वरित कामे लवकरात लवकर उरकून घ्यावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात येत आहे.
याच्यापेक्षा वाईट दिवस काय असतील? शेतकऱ्यांच्या वांग्याला प्रति किलो 27 पैसे दर...
पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), आजपासून राज्यात कोरडे वातावरण राहील. तर विदर्भामध्ये पुढील दोन ते तीन दिवस तापमानाचा पारा 38 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
कुमकुम भेंडीला ५०० रुपये किलोचा भाव, शेतकऱ्यांना आहे फायदेशीर..
तर 14 ते 16 मार्च दरम्यान विदर्भात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे, आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. यामुळे अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शिंदे सरकारची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार
त्याने फुकट भाजी विकली, पण त्याच्या डोळ्यातले पाणी कोणाला दिसलेच नाही..
छत्रपती कारखाना लवकरच गतवैभव प्राप्त करणार, नवीन प्रकल्पाच्या कर्जाचा शेवटचा हप्ता राहिला...
Published on: 09 March 2023, 05:01 IST