Farmers Association: अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं दिल्लीतील पंजाब खोर या गावामध्ये देशातील 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या. पंजाब खोरमध्ये MSP गॅरंटी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढत असताना केंद्र सरकारकडून देशातील शेतकरी चळवळीला बदनाम करुन फूट पाडत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. सर्वच राजकीय पक्षांनी या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील सिंह यांनी दिला आहे.
या अधिवेशनाला दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, आसाम, मेघालय, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात आणि राजस्थान या राज्यातील शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी उपपस्थित होते.
देशात जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी
MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यामुळं किमान हमीभावाचा कायदा लागू करावा अशी भूमिका शेट्टींनी मांडली.
दिल्लीतील पंजाब खोर इथे आयोजित करण्यात आलेल्या MSP गॅरंटी किसान मोर्चाच्या अधिवेशनात राजू शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सहभाग नोंदवला आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आखली रणनीती; आता...
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील 460 ग्रामपंचातीच्या गावसभेमध्ये देशाच्या संसदेत हमीभावाचा कायदा मंजूर करावा तसेच राष्ट्रपतींनी तसा त्यांना आदेश द्यावा असे ठराव एकमताने मंजूर केला आहे. लवकरच हे ठराव राष्ट्रपतींना सुपुर्द करणार असल्याची माहिती देखील राजू शेट्टींनी यावेळी दिली.
स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात संसदनं अनेक कायदे केले ते अधिकारी व मंत्र्याच्या इच्छेखातर. मात्र, इतिहासात प्रथमच 2017 पासून किमान हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
ब्रेकिंग! पक्षचिन्हासोबत आता थेट पक्षाध्यक्षपदावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
Published on: 07 October 2022, 05:48 IST