News

महत्त्वाचे निसर्गतः आढळणारे जमिनीतील अनेक सूक्ष्म जीव पिकांच्या पोषणामध्ये अन्नद्रव्यांचे शोषण होण्यासाठी मोलाची भूमिका निभावत असतात. जमिनीची सुपीकता अबाधित ठेवण्यासाठी जैविक शास्त्राची मदत हाच जैविक शेतीचा आधार ठरू शकते. जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्याचं जीवाणू, बुरशी यांसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. जमिनीमधील अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्य हे सूक्ष्मजीव करतात.सूक्ष्म जीवांनी संपृक्त असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते.

Updated on 14 February, 2023 9:56 AM IST

महत्त्वाचे निसर्गतः आढळणारे जमिनीतील अनेक सूक्ष्म जीव पिकांच्या पोषणामध्ये अन्नद्रव्यांचे शोषण होण्यासाठी मोलाची भूमिका निभावत असतात. जमिनीची सुपीकता अबाधित ठेवण्यासाठी जैविक शास्त्राची मदत हाच जैविक शेतीचा आधार ठरू शकते. जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्याचं जीवाणू, बुरशी यांसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. जमिनीमधील अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्य हे सूक्ष्मजीव करतात.सूक्ष्म जीवांनी संपृक्त असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते.

मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी व ती अबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची जनन क्षमता कमी होऊ लागली आहे. रासायनिक खतांच्या मुक्त वापरामुळे रसायनांचा अंश अन्नधान्यात शिल्लक राहतो परिणामी विविध घातक आजार संभवतात.

परिणामी सुरक्षित व सकस अन्नासाठी जगभरात जैविक पद्धतींचा अवलंब केला जात आहे. प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खत, जीवाणू संवर्धन, बॅक्टेरीयल कल्चर किंवा बॅक्टेरियल इनॉक्युलंट म्हणतात. नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.

शेतकऱ्यांनो हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? जाणून घ्या..

जैविक खतांचे फायदे :
१. जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकण्यास मदत होते परिणामी पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
२. जैविक खतांमध्ये जमीन, पाणी व पिके यांसाठी घातक अशी कोणतीही रसायने नसल्याने उपयुक्त अशा सूक्ष्मजीव व मित्र किडींना कसलाही अपाय होत नाही.

३. सूक्ष्मजीवांनी उपयुक्त असलेल्या जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या प्रति जैविकांमुळे पिकाची रोग व कीड़ प्रतिकारशक्ती वृद्धींगत होते.४. सूक्ष्मजीवांनी उपयुक्त असलेल्या जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या संजीवकांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते व पिकाची वाढ चांगली होते.
५. जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इन्डॉल ऍसिटीक अॅसिड यासारखी संप्रेरके व विटामीन बी झाडांना मिळवून देतात.

६. जैविक खतांच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो तसेच उत्पादनात १५ ते ३० टक्क्यांनी वाढ होते.
७. सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते व नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
८. जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचेदेखील नियंत्रण होते.९. जैविक खते तुलनेने स्वस्त असल्याने उत्पादन खर्चात बचत होते.
१०. नत्र स्थिर करणारी जैविक खते प्रती हेक्टरी २५ ते ३oo किलोपर्यंत एवढे हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. रासायनिक खतांद्वारे एवढे नत्र उपलब्ध करण्यासाठी १ ते १२ गोणी युरिया वापरावा लागेल.

शेतीबद्दल सकारात्मक विचार गरजेचा

११. काही रासायनिक खते पुर्णत: पिकांना उपलब्ध होत नाहीत. जसे की, स्फुरदयुक्त रासायनिक खतांच्या उपलब्धतेचे प्रमाण १५ ते २० टक्के इतके आहे. उर्वरित ८५ ते ८० टक्के स्फुरद जैविक खतांच्या वापराने उपलब्ध होऊ शकते.

१२. महाराष्ट्रातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याच्या प्रमुख कारणांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे एक आहे. झिंक विरघळविणारी जैविक खते जमिनीतील खनिज स्वरूपातील झिंक विरघळवून पिकांना उपलब्ध करतात परिणामी उत्पादनात वाढ होते.
१३. जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन त्यात बचत होऊ शकते.
लेख संकलित आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो मातीचा नमुना घेण्याची अचूक पध्दत, जाणून घ्या..
जिवामृत म्हणजे काय? जिवामृताच्या फवारणीचा परिणाम, शेतकऱ्यांनो जाणून घ्या..
विषमुक्त शेती व पशु विषयक उत्पादनांचा लोकप्रिय ब्रँड - इरिच इंडिया...

English Summary: Farmers, understand agriculture..
Published on: 14 February 2023, 09:56 IST