News

शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, अद्याप ते पैसे जमा झाले नाहीत. यामुळे याकडे शेतकऱ्यांनचे लक्ष लागले आहे. यामुळे आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

Updated on 11 July, 2022 3:51 PM IST

राज्यात नुकतेच नवीन सरकार आले आहे. यामुळे काहींना आनंद झाला तर काहींना दुःख झाले. मात्र यामध्ये सर्वसामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, अद्याप ते पैसे जमा झाले नाहीत. यामुळे याकडे शेतकऱ्यांनचे लक्ष लागले आहे. यामुळे आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यामुळे आता या विरोधात 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूरमधील दसरा चौकात एकत्र येण्याच आवाहन राजू शेट्टींनी केले आहे. यामुळे आता हे सरकार काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राजू शेट्टी म्हणाले, निर्णायक लढाईसाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात उपस्थित राहा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाहीत. मार्च 2022 च्या बजेटमध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. हे पैसे 1 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते. मात्र असे झाले नाही.

या गोष्टी कधीही चहासोबत खाऊ नका, आरोग्यासाठी आहे खूपच धोकादायक

आता नवीन सरकार म्हणत आहे की, मागील सरकार हे अल्पमतात होते, त्यांच्या निर्णयाची अमंलबजावणी करणार नाही. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.सध्या पाऊस सुरू झाला आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशांची गरज लागणार आहे. यामुळे तुम्ही साथ दिली तर यापेक्षाही मोठी लढाई मी करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. सगळेजण मिळून हे पैसे वसूल करु असे शेट्टी म्हणाले.

जनधन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार 3 हजार रुपये

यामुळे या रकमेत कोल्हापूरला सर्वाधिक रक्कम मिळणार आहे. यामुळे सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यामुळे गट तट विसरुन एकत्र या. गटात तटात आता काय राहिले आहे. कोण कोणालाही मिठी मारत असल्याचे शेट्टी म्हणाले आहेत. यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
लाकडी- निंबोडी योजनेला कायमस्वरूपी बंदी? मुख्यमंत्र्यांना निवेदन
राज्यात वाढतोय रेशील उद्योग, शेतकऱ्यांना 3 लाखांपेक्षा जास्तीचे अनुदान
मोठी बातमी! विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका चार महिन्यांचा तुरुंगवास

English Summary: Farmers supposed get Rs 50,000 July 1 government changed
Published on: 11 July 2022, 03:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)