News

गतवर्षी अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही शिल्लक आहेत. ऊस लागवडीची नोंदणी सहकारी साखर कारखान्याकडे केली नाही, असे अनेक शेतकरी आहेत. यामुळे उसाची तोडणीच होऊ शकली नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र आता यावर उपाय म्हणून राज्याच्या साखर आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे.

Updated on 08 June, 2022 3:35 PM IST

गतवर्षी अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही शिल्लक आहेत. ऊस लागवडीची नोंदणी सहकारी साखर कारखान्याकडे केली नाही, असे अनेक शेतकरी आहेत. यामुळे उसाची तोडणीच होऊ शकली नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र आता यावर उपाय म्हणून राज्याच्या साखर आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

साखर कारखान्याकडे बिगर नोंदणी असलेल्या उसाची नोंदणी शेतकऱ्यांना आता थेट साखर आयुक्तालयाकडे करता येणार आहे. यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र ऊस नोंदणी ॲप विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या ॲपचे काम पूर्ण झाले आहे. त्याची आता चाचणी केली जात आहे. ही चाचणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

ॲपच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी हे घरबसल्या त्यांच्या उसाची नोंदणी करू शकणार आहेत. यामुळे हे फायदेशीर ठरणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, यामुळे राज्यातील उसाचे अचूक क्षेत्र कळण्यास मदत होईल. तसेच साखर कारखान्याकडे उसाची नोंदणी नसली तर साखर आयुक्तालयाकडे मात्र नोंदणी होणार आहे. राज्यातील अनेक शेतकरी ऊस लागवडीची नोंदणी करत नाहीत. यामुळे अडचण निर्माण होते.

चांदुरच्या तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण, कांदा प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक

या अँपमुळे लागवड झालेल्या सर्वच उसाची नोंदणी होण्यास मदत होणार आहे. परिणामी साखर कारखान्याकडे नोंदणी नसलेल्या बिगर नोंदणी उसाची नोंदणी या ॲपवर होणार आहे. यामुळे उसाच्या गळपाचे देखील योग्य नियोजन करता येणार आहे. यामुळे अतिरिक्त ऊस आणि इतर अनेक प्रश्न निर्माण होणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या;
शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र, साखर कारखान्यांबाबत म्हणाले..
मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित, अनेकांना धक्का
कौतुकास्पद! 'फार्मर प्रोड्युसर'द्वारे पुरंदरचे जगात नाव, तरुणांनी करून दाखवले..

English Summary: Farmers, sugarcane not registered, Sugar Commissionerate big decision
Published on: 08 June 2022, 03:30 IST