शेतकऱ्यांच्या मालाचे मार्केटिंग ही मोठी समस्या आहे. कृषी उत्पादनात मूल्यवृद्धी केल्यास निश्चितच उत्पन्न वाढू शकते. त्यासाठी कृषी धोरण ठरवताना शेतकरी केंद्रस्थानी असला पाहिजे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.
पुण्यातील यशदा येथील प्रोबेशनरी आयएएस अधिकाऱ्यांची तुकडी तीन दिवसीय प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात दाखल झाली होती.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. प्रशांत पाटील बोलत होते. तीन दिवसांच्या या दौऱ्यात कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, फळ प्रात्यक्षिक क्षेत्र, औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्प, फलोत्पादन, फळ रोपवाटिका, कोरडवाहू संशोधन प्रकल्प, पशुसंशोधन प्रकल्प, सूक्ष्म सिंचन पार्क, विद्यापीठ ग्रंथालय, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळा, बेकरी युनिट आणि एकात्मिक उपकरणे प्रकल्पांना प्रोबेशनरी आयएएस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन माहिती गोळा केली.
कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले की, भारत हा देश आणि राज्य विविध जैवविविधतेने समृद्ध असले तरी या जैवविविधतेकडे पाहिजे तसे लक्ष दिले गेले नाही. शेतकऱ्यांच्या मालाचे मार्केटिंग ही मोठी समस्या आहे. कृषी उत्पादनात मूल्यवृद्धी केल्यास निश्चितच उत्पन्न वाढू शकते. त्यासाठी कृषी धोरण ठरवताना शेतकरी केंद्रस्थानी असला पाहिजे.
बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. विजय शेलार यांनी कृषी विद्यापीठाच्या बौद्धिक संपदेची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने यावर भाष्य केले. टी.पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या स्थितीबाबत माहिती दिली. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच यशदा संस्थेतून आलेले अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
खरं काय! 'या' राज्याची सरकार गाय पालणासाठी देणार 10 हजार 800 रुपये
Published on: 22 May 2022, 01:19 IST