शेतकऱ्यांना सध्याच्या काळात शेती करणे अवघड झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे असताना शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांचे सीबील तपासूनच कर्ज देण्याची भूमिका बँकांनी घेतली आहे.
यामुळे त्यांना कर्ज मिळणे अवघड झाले आहे. ही बाब रयत क्रांती पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत रिझर्व्ह बॅंकेला (RBI) कळविले आहे.
बँकांची नियमावली आणि बुडीत कर्ज होऊ नये यामागची भूमिका पाहता हे बरोबर आहे. परंतु शेतीसाठी आपण किती रूपयांचे कर्ज देतो ? सरकार शेतमाल भावात हस्तक्षेप करते की करत नाही आपल्या शेतीसाठी आपण पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत का ? याची उत्तरे आधी तपासली पाहिजे.
काश्मीरचे सफरचंद आता पुण्यात पिकतय, भोरच्या शेतकऱ्याची कमाल..
असे सीबील तपासून कर्ज द्यायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना कर्जच मिळू शकणार नाही. म्हणून शेती कर्जासाठी सीबीलची अट असू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अशा निर्णयांमुळे शेतकरी उध्वस्त होईल.
याबाबत सीबीलबाबतचे मुद्दे तपासून शेतकऱ्यांना सविस्तर उत्तर पाठविण्याच्या सूचना अधिकाऱ्याने रिझर्व्ह बॅंकेला केल्या आहेत. रिझर्व्ह बॅंक आतापर्यंत तरी केंद्र सरकारचे अनेक आदेश पाळले नाहीत. यामुळे याचा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.
पुन्हा पाऊस! पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता..
त्यामुळे शेतकऱ्यांच्या सीबीलबाबत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंक किती गांभीर्याने घेते? ते पाहावे लागेल. दरम्यान, सीबील तपासून शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे म्हटले तर एकाही शेतकऱ्याला कर्ज मिळणार नाही. म्हणून शेती कर्जासाठी सीबीलची अट असू नये.
महत्वाच्या बातम्या;
लाल मिरची 700 रुपये किलो, उत्पादन घटल्याचा परिणाम
मोर्चा इफेक्ट! आता खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरले जाणार
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर
Published on: 14 November 2022, 02:08 IST