News

कांदा बीजोत्पादनासाठी एकात्मिक परागीभवन कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा.

Updated on 21 April, 2023 12:11 PM IST

कांदा बीजोत्पादनासाठी एकात्मिक परागीभवन कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा.

मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी मोहरी, बडीशेप, कोथिंबीर यांसारखी पिके बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती लावावीत. कांदा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्यांची कापणी करावी. जमिनीत अतिरिक्त ओलावा किंवा अधिक कोरडेपणा असल्यास मधमाश्या येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पुरेसे पाणी द्यावे. शेतामध्ये फुलोऱ्यात असणारी सर्व तणे काढून टाकावीत. चांगल्या परागीभवनासाठी १० टक्के फुले उमलल्यानंतर, शेतात मधमाश्यांच्या पेट्या (एपिस मेलीफेरा/ एपिस सेराना जातीच्या ४ ते ६ पेट्या किंवा टेट्रागोनुला स्पे. ८ ते १२ पेट्या प्रति एकर) ठेवाव्यात. शेतात आणि सभोवतालच्या क्षेत्रात मधमाशी पेटीचे तोंड शेताच्या आतील दिशेने ठेवावे.

मालक वाचला पण बैल जोडीने साथ सोडली, मालक ढसाढसा रडला...

कांद्यांमध्ये हंगाम (Onion) आणि रंगानुसार अनेक जाती आहेत. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने भीमा डार्क रेड, भीमा रेड, भीमा राज, भीमा सुपर, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाईट रेड, भीमा शुभ्रा, भीमा श्‍वेता आणि भीमा सफेद अशा दहा जाती विकसित केल्या आहेत.

आता शेतातील दगडांची अडचण होणार दूर, स्टोन पिकर येणार मदतीला, जाणून घ्या..

अनेकदा चांगले कांदे बाजारात विकले जातात आणि खराब कांदे बीजोत्पादनासाठी वापरले जातात. त्यामुळे कांद्याच्या नवीन पिढीमध्ये अनेक वैगुण्ये वाढतात. चांगला वाण टिकवून ठेवणे, सुधारणा करण्याच्या दृष्टीने बियाण्यासाठी चांगल्या कंदाची लागवड करावी. यामुळे हे फायदेशीर आहे.

सिताफळ देईल बंपर उत्पादन, करा फक्त 'असे' नियोजन
७०० ते १२०० लिटरपर्यंत दूध, 'या' म्हशीच्या जाती ठरत आहेत फायदेशीर
कमी गुंतवणुकीत सुरु करा लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग, होईल फायदा, जाणून घ्या...

English Summary: Farmers, learn onion seed production management
Published on: 21 April 2023, 12:11 IST