शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. मात्र कर्जत तालुक्यातील बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतामध्येच जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अशातच आता पोश्री नदीवरील पुलामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतावर जात आहेत.
ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोरगाव गावाच्या मागील बाजूस असलेल्या पोश्री नदीवरील पूल गेली कित्येक वर्ष अर्धवटच आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना अर्धवट असलेल्या पुलावरून आणि त्यानंतर वाहत्या पाण्यामधून शेतीच्या कामांसाठी आपला जीव धोक्यात घालून जावं लागत आहे.
पुलाचे काम हे काही महिन्यांसाठी रखडलेले नाही तर गेल्या आठ वर्षांपासून या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बोरगाव पुलाकडे लोकप्रतिनिधींनी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पुलाच्या कामासाठी केलेला खर्च वाया
पोश्री नदीच्या पलीकडे गुडवण भागात बोरगाव, भवानीपाडा, उंबरखांड या भागातील स्थानिक नागरिकांच्या जमिनी आहेत. या शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेती करण्यासाठी जावे लागते. त्यामुळे या भागात पोश्री नदीवर शासनाने लाखो रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला परवानगी देत पुलाचे काम मंजूर केले.कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काही ठेकेदार नेमण्यात आले व या पुलाचे काम सुरु झाले मात्र काम अर्धवटच ठेवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
पीक विमा: एका कृषी अधिकाऱ्यामुळे हजारो शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित
मधमाशी पालनासाठी प्राध्यापकांचा अभिनव उपक्रम; सरकारनेही दिली शाब्दासकी..!
Published on: 27 July 2022, 06:09 IST