News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून राज्यासह देशात प्रसिद्ध आहेत. असे असताना आता सांगली-कोल्हापूरच्या लोकांनी त्यांना लोकवर्गणीतून गाडी दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. शेतकऱ्यांनी आपल्या खिशातून पैसे घालत फिरण्यासाठी चक्क नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर (new Fortuner) कार भेट दिली आहे.

Updated on 15 June, 2022 4:40 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून राज्यासह देशात प्रसिद्ध आहेत. ऊस दराच्या आणि दूध दराच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांना उसाचे आणि दुधाचे गणित माहिती नसताना त्यांनी याचा हिशोब शेतकऱ्यांना समजावून सांगितला. यामुळे शेतकऱ्याना त्यांच्या हक्काचे चार पैसे मिळाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात भरभराटी देखील आली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले.

यामुळे शेतकरी देखील त्यांना आपला नेता मानू लागले. असे असताना आता सांगली-कोल्हापूरच्या लोकांनी त्यांना लोकवर्गणीतून गाडी दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. शेतकऱ्यांनी आपल्या खिशातून पैसे घालत फिरण्यासाठी चक्क नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर (new Fortuner) कार भेट दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना दोन वेळा कृषीरथ म्हणून फिरण्यासाठी गाडी भेट दिली.

यामुळे राजू शेट्टी (raju shetti farmer leader) चांगलेच भारावून गेले आहेत. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकवेळा रक्त सांडले आहे. यामुळे राजू शेट्टींवर शेतकरी जिवापाड प्रेम करतात. यामुळेच लोकवर्गणी काढून राजू शेट्टींना खासदार करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आज पर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही.

राज्यातील 6 कंपन्यांकडून बोगस खताची निर्मिती, केंद्राने दिले फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे त्याचा मी कृतज्ञपुर्वक स्वीकार करतो, असेही ते म्हणाले. शेट्टी आणि शेतकरी हे समीकरण झालंय. दूध, ऊस दरवाढीसह विविध विषयांवरच्या आंदोलनात शेट्टींचा सहभाग असतो. त्यांच्या आंदोलनामुळे अनेकदा ऊसदर आणि दूध दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना नेहेमी फायदा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! मान्सून महाराष्ट्रावर रुसला, जोरदार सुरुवातीनंतर घेतला ब्रेक..
सर्वसामान्यांना झटका! गॅस कंपन्यांनी गॅस कनेक्शनबाबत घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो शेतात सौर पंप बसवण्यावर 90% सबसिडी, वाचा संपूर्ण माहिती

English Summary: Farmers give new Fortune gift to their farmer leader, farmers still love Raju Shetty
Published on: 15 June 2022, 04:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)