News

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची विजतोडणी केली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला, आता सरकार बदलले आहे. मात्र आता देखील तीच परिस्थिती येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा टेन्शन वाढले आहे. थकित वीजबिल तत्काळ भरा अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येणार अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतली आहे.

Updated on 15 November, 2022 10:00 AM IST

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची विजतोडणी केली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला, आता सरकार बदलले आहे. मात्र आता देखील तीच परिस्थिती येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा टेन्शन वाढले आहे. थकित वीजबिल तत्काळ भरा अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येणार अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतली आहे.

यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, याचा फटका लातूर परिमंडळातील 18 हजार 667 शेतकऱ्यांना बसला आहे. थकित वीज बिलासाठी कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडे 73 कोटींची थकबाकी आहे. यामुळे आता महावितरण पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. वीज बिल वसुलीसाठी महावितरणने लातूर परिमंडळात आठ दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे.

आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील उदगीर विभागातील पाच हजार पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले आहेत. यामुळे आता पिके जळून जाण्याच्या अवस्थेत आहेत. आठ दिवसांत 18 हजार 667 पेक्षा जास्त शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. यात आता वीज तोडली जात असल्याने अजूनच नुकसान होणार आहे.

भवानीनगरमध्ये शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी, तज्ञांकडून मार्गदर्शन..

या मोहिमेमुळे शेतकऱ्यांपुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे. लातूर परिमंडळात लातूर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश होतो. वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडे 73 कोटीची थकबाकी आहे. एकूण थकबाकी खूप आहे. यामुळे ही मोहीम राबविण्यात आली आहे. यामुळे आता विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी सीबीलची अट नको, शेती करणे झाले अवघड

याबाबत लातूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन दिवटे यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, मागील चार ते पाच वर्षापासूनची थकबाकी असणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी अनेक योजना देखील आणल्या गेल्या मात्र शेतकऱ्यांनी अजूनही पैसे भरले नाहीत. यामुळे आता पुन्हा कारवाई केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर..'शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न सुरु'महाराष्ट्रात टाटा पॉवरउभारणार 150 मेगा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...

English Summary: Farmers' electricity started cut off, crops burning
Published on: 15 November 2022, 10:00 IST