शेती व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे देश विकासासाठी शेतीचा विकास(Development of agriculture)तितकाच गरजेचा आहे. शेती करताना शेतकरी पूर्वनियोजन आणि योग्य व्यवस्थापन करत असतो मात्र तरीही शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात. बऱ्याचदा शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या जगासमोर येत नाहीत. मात्र कृषी जागरण आपल्या शेतकरी बंधूना एक व्यासपीठ देत आहे.
कृषी जागरण (krushi jagran) शेतकऱ्यांना पत्रकार बनवण्यासाठी अनेक गोष्टींनी प्रयत्न करत आहे. कृषी जागरणच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतीच्या कामांची माहिती जगासमोर मांडू शकता. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवनवीन शोध आणण्यासाठी कृषी जागरण नेहमीच सक्रिय आहे. आज या सत्राच्या पहिल्या बॅचचे ट्रेनिंग पार पडले.
या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना योग्य मोबदलाही दिला जाणार आहे. यामध्ये उच्च दर्जाचा व्हिडीओ जो शेती विषयी नवीन माहिती दर्शवितो. तुम्ही शेअर करत असलेल्या व्हिडिओचा कालावधी 3 ते १० मिनिटांचा असावा आणि तो स्वतंत्रपणे चित्रित केला गेला पाहिजे. एकदा तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओ शेअर केल्यानंतर, तो व्हिडिओ वापरण्याचा एकमेव अधिकार कृषी जागरणला आहे.
Sugarcane FRP; एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, ऊस उत्पादकांसाठी किसान सभेचा मोठा निर्णय
याबाबतची सगळी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी कृषी जागरणाचे संस्थापक संपादक एम. सी डॉमिनिक हे देखील उपस्थित होते. ते म्हणाले, बदलत्या काळात शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, बाजारभाव आपल्याला मिळणाऱ्या योजना याची माहिती त्यांना मिळायला हवी. यासाठी कृषी जागरण एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
'शहाजीबापू पाटील यांनी आमदारकी निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये घेतले होते, मात्र परत केले नाहीत'
शेतकऱ्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. यामध्ये शेतकरी शेतीची माहिती, शेतीच्या बातम्या, यशोगाथा, ते पत्रकार म्हणून दुसर्या शेतकर्यांच्या मुलाखती घेऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांसाठी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. यामध्ये तुम्ही नोंदणी केली नसेल तर अजूनही तुम्ही नोंद करू शकता. यासाठी पराजी शिंदे ९८१८८७५३९५, ऋतुजा शिंदे, ७२१७८९४३४०, आयशा रॉय ७६७८६५३४१० यावर संपर्क करावा.
महत्वाच्या बातम्या;
शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी राजू शेट्टी आग्रही, मोदी सरकारकडे केली मोठी मागणी
विधानभवनासमोर राडा! आई बहिणीवरून शिवीगाळ, आमदारांच्यात हाणामारी...
'शहाजीबापू पाटील यांनी आमदारकी निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये घेतले होते, मात्र परत केले नाहीत'
Published on: 24 August 2022, 03:40 IST