News

राज्यातील शेतकरी सध्या अनेक संकटांचा सामना करत आहेत. असे असताना शेतकरी आक्रमक होत असून शेजारच्या राज्यात जाण्याची भाषा करत आहेत. कर्नाटक, तेलंगणा, गुजरात सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना चांगल्या सोयी मिळत असल्याचे ते सांगत आहेत.

Updated on 05 December, 2022 4:17 PM IST

राज्यातील शेतकरी सध्या अनेक संकटांचा सामना करत आहेत. असे असताना शेतकरी आक्रमक होत असून शेजारच्या राज्यात जाण्याची भाषा करत आहेत. कर्नाटक, तेलंगणा, गुजरात सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना चांगल्या सोयी मिळत असल्याचे ते सांगत आहेत.

या सगळ्या गोष्टींना इथले आजपर्यंतचे राज्यकर्ते कारणीभूत आहेत. शेतकर्‍यांनी राज्य बदलू नये, राज्यकर्ते बदलावेत. राज्यकर्ते, कारखानदार, दूध संघ व पाळीव संघटनांचे संगनमत वेळीच ओळखावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.

सध्या सीमावाद पेटला आहे, अनेक राजकीय मंडळी हे वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. जतमधील अनेक गावे पाण्यासाठी कर्नाटक राज्यात जाण्याची भाषा करत आहेत. तसेच तेलंगणा, गुजरातमध्ये जाण्याचे अनेकजण म्हणत आहेत.

चळवळीचे साक्षीदार ९० वर्षाचे बयाजींची आज साथ सुटली! राजू शेट्टी भावूक

यासाठी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांचा भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभार कारणीभूत आहे. पाटील म्हणाले, बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांचे हित पाहिले जात नाही. शेतीमाल विक्रीनंतर 24 तासात शेतकर्‍याला पैसे मिळाले पाहिजेत.

तसा कायदा आहे, पण दोन-दोन महिने रक्कम मिळत नाही. धान, ज्वारी, बाजरी, मका यासह अन्नधान्य, कडधान्याला किमान आधारभूत किंमतीमध्ये मोठी तफावत आहे. याचा शेतकर्‍यांना फटका बसत आहे.

गुजरात कोणाच? विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

तसेच उत्तर प्रदेशमध्ये उसाला टनाला 3 हजार 900 रुपये आणि गुजरातमध्ये 4 हजार 700 रुपये दर मिळत असताना महाराष्ट्रात मात्र परिस्थिती बिकट आहे. हे साखर कारखानदार आणि पाळीव संघटनांचे संगनमत आहे, अशी टीका रथुनाथदादा पाटील यांनी केली.

महत्वाच्या बातम्या;
आता पाणीपट्टी थकवली की न्यायालयाची नोटीस, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे धाबे दणाणले..
आता एसटीत द्या ऑनलाइन पैसे, सुट्या पैशांची कटकट मिटणार..
गुजरात कोणाच? विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

English Summary: 'Farmers don't want the government, change the rulers'
Published on: 05 December 2022, 04:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)