News

टोमॅटोच्या झाडापासून काहीतरी बोध घेऊन स्वतःला सिद्ध करण्याची उमेद घेतली पाहिजे. या आशयाच्या पोस्टसह फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष करून शेतकरी ग्रुपमध्ये ही पोस्ट व्हायरल होत असून शेतकऱ्याने आत्महत्येपासून परावृत्त होण्याच्या हा केलेला छोटासा प्रयत्न असल्याचीही चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरु आहे.

Updated on 21 March, 2022 12:17 PM IST

फोटोतील रोपट्याने संपलो म्हणून जीवनाचा शेवट करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांनाच आपले अस्तित्व सिद्ध करत प्रेरणादायी शिकवण दिली आहे. त्यामुळे समाजात काही लोकांना असे वाटते की आम्ही अपयशी किंवा कुचकामी ठरलो आहे. आम्ही आमच्या जिवनात काहीच करू शकत नाही. आम्ही संपलो, बरबाद झालो. त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून काहीतरी बोध घेऊन स्वतःला सिद्ध करण्याची उमेद घेतली पाहिजे.

या आशयाच्या पोस्टसह फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष करून शेतकरी ग्रुपमध्ये ही पोस्ट व्हायरल होत असून शेतकऱ्याने आत्महत्येपासून परावृत्त होण्याच्या हा केलेला छोटासा प्रयत्न असल्याचीही चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरु आहे. शिवाय या पोस्टला अधिकाधिक शेअर करण्याचे आवाहन केले जात आहे. एक टोमॅटोचे झाड रेल्वे रुळाच्या बाजूला उगवले आहे. ते नुसते उगवले नसून त्याला फळ देखील आले आहे.

एखाद्या रेल्वे प्रवाशाने या टोमॅटो रोपाचे बी धावत्या रेल्वे गाडीतून फेकले असावे. मात्र हे बीज माती सारून नाहीतर रेल्वेच्या पटरी शेजारील पडलेल्या काळ्या पाषाण दगडाला भेदून रोपट्यात रूपांतरित झाले. शिवाय या रोपट्याला फळ देखील लागले आहे. यामुळे याकडे अनेकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

रेल्वे रुळाच्या बाजूला खडकांमध्ये टिकून राहताना शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेन या झाडाच्या अगदी जवळून जात कर्कश्श आवाज करत असतील. या परिस्थिती त्याला अस्तित्व संपण्याची भिती निर्माण होत असेल, परंतु संघर्ष करत करत शेवटी त्यांने एका टोमॅटोच्या फळाला जन्म दिलाच.

या झाडाला ना कोणी पाणी दिले, ना माती दिली, ना खत दिल, ना कोणी त्याचे संगोपन केले. मात्र कुठल्याही आधाराशिवाय त्याने स्वतःला मोठे केले. त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते म्हणजे फळ देणे. हे उद्दिष्ट त्याने संघर्ष करून पुर्ण सुध्दा केले. यामुळे सोशल मीडियात सध्या याची चर्चा रंगत आहे. ही पोस्ट अनेकजण शेअर करत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
झाडाला फक्त १० टक्केच फळे, कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात; दर वाढण्याची शक्यता
शेतकऱ्यांनो १० दिवस राहिलेत, निम्मीच रक्कम भरायचीय, महावितरणच्या योजनेत व्हा सहभागी..

English Summary: Farmers, don't commit suicide, reading this post will change the course of your life.
Published on: 21 March 2022, 12:17 IST