बहुजन संघर्ष समितीच्या वतीने नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित शेतकरी रॅलीत राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत बोलत होते. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, ज्या देशातील विरोधीपक्ष हा कमजोर असतो,त्या देशात हुकूमशाही जन्माला येते आणि आपल्या देशात हुकूमशाहीने जन्म घेतला आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपुरातील प्रशिक्षण केंद्रात नकली मुस्लीम, हिंदू, शिखांची निर्मिती केली जाते, असेही ते म्हणाले.
तसेच आत्महत्या करून प्रश्न मिटणार नाही. लढावे लागले. तेव्हा आत्महत्या करू नका, आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन टिकैत यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच त्यांनी खासगीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला व स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनालाही त्यांनी आपले समर्थन जाहीर केले.
शेजाऱ्यांनो वीजचोरीची माहिती द्या आणि मिळवा बक्षीस! महावितरणकडून अनोखी युक्ती
याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर बहुजन संघर्ष समितीचे नागेश चौधरी, माजी मंत्री सुनील केदार आणि इतरही शेतकरी नेते उपस्थित होते. किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी आता शेतकऱ्यांना संघटीत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत.
दरम्यान, देशातील अनेक शेतकरी संघटना या शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरत आहेत. सध्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी देखील आंदोलने केली जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
अवघडच झालं! पैसे परत द्या नाहीतर देवावर हात ठेऊन शपथ घ्या, निवडणुकीत पराभव झालेल्या महिलेचा मतदारांना दम..
पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पादन, युवा शेतकऱ्याचा खडकाळ जमिनीमध्ये अभिनव प्रयोग..
या गावातील प्रत्येक शेतकरी करोडपती, प्रत्येकाकडे आलिशान घर महागडी वाहने, एका पिकाने बदलले नशीब
Published on: 13 January 2023, 11:25 IST