कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेती आणि शेतीच्या निगडित व्यवसायांत जवळजवळ ७०% जनता कार्यरत आहेत. शिवाय शेतमालाच्या निर्यातीमुळे शेतकऱ्यांना आणि व्यापारांना बराच आर्थिक फायदा होत असतो. त्यामुळे अधिकाधिक शेतमालाची निर्यातवाढ झाल्यास त्या मालाची ग्रामीण भागात मागणीत वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यदेखील मिळेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीला त्याचा मोठाच हातभार लागेल.युक्रेन - रशिया युद्धामुळे भारताला ती संधी मिळाली आहे.
युक्रेन - रशिया युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभर पडले आहेत. इतर देशांप्रमाणे भारतालाही या युद्धाचा चांगलाच फटका बसला आहे . विशेषतः या युद्धामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशातील महागाईत भर पडली आहे. युक्रेनमध्ये गव्हाचे मोठे उत्पादन होते . त्यांच्याकडून गहू आयात करणारे अनेक देश आहेत . पण युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा व्यवसाय ठप्प पडला आहे. हे सर्व थांबल्यामुळे त्या देशांना गव्हासाठी नवीन पुरवठादार देश हवा आहे. आणि त्यांच्या या मागण्या भारत देश प्रभावीरीत्या भागवू शकतो.
गेली तीन वर्षे भारतात धान्य उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे भारत देश स्वत:ची गरज भागवून गव्हाची निर्यात सहजरित्या करू शकतो.तशी निर्यात भारताने करायला सुरवातही केली आहे. साहजिकच या निर्यातीमुळे भारतातील गव्हाच्या किंमतीही वाढण्याचा धोका आहे. मात्र, अधिक उत्पादनामुळे देशात जे साठे पडून राहिले होते, त्याची निर्यात होऊ शकते. आणि त्यातून गहू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ बराच होऊ शकतो.
मध्य प्रदेशात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मागील वर्षी १८ - १९ रुपये किलो असा भाव असणाऱ्या गव्हाला यंदा २२ ते २८ रुपयांचा दर मिळला आहे.शिवाय सरबती गव्हाचा भाव तर ३० ते ३५ रुपयांवर गेला आहे. हा गहू 'सरबती गहू' या नावाने निर्यात करण्याचा निर्णय त्या राज्याने घेतला आहे. जवळजवळ ३.७५ मेट्रिक टन गहू त्या राज्याने निर्यातीसाठी तयार ठेवला आहे.
भारताने ३१ मार्च अखेरपर्यंत ४० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. आणि त्यात २१ मार्च अखेरपर्यंत भारताने ७०.३० लाख टन गव्हाची निर्यात केली आहे. युद्धस्थिती नसतानाही भारतीय गव्हाची निर्यात झालेली दिसून येत आहे. आता युद्धामुळे तर गव्हाची मागणी अधिकच वाढली असल्याने यावर्षी त्याची निर्यातीत विक्रमी वाढ होऊ शकते. युद्धामुळे जगात अन्नधान्याची वाढलेली मागणी आणि भारतात त्याचे वाढलेले उत्पादन हा योग जुळून आल्यामुळे शेतकऱ्यांना बराच नफा होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी! याठिकाणी पुन्हा पावसाची शक्यता
शेतकऱ्यांनो 'हा' जोडव्यवसाय ठरणार फायदेशीर! सरकारही देतंय ८ लाखापर्यंत अनुदान, वाचा सविस्तर
आपत्कालीन संकटांपासून कसे कराल पिकांचे संरक्षण? शेडनेटमधील शेती म्हणजे काय ?
Published on: 23 April 2022, 03:23 IST