News

बियाणे हा उत्पादन वाढीतील सगळ्यात पहिला घटक आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे जर बियाणे दर्जेदार असेल तर येणारे पीक देखील उत्तम आणि दर्जेदार मिळते. हा नियमच आहे.

Updated on 11 May, 2022 2:23 PM IST

 बियाणे हा उत्पादन वाढीतील सगळ्यात पहिला घटक आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे जर बियाणे दर्जेदार असेल तर येणारे पीक देखील उत्तम आणि दर्जेदार मिळते. हा नियमच आहे.

त्यामुळे  दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहेच की, बरेच शेतकरी घरच्या घरी बियाणे तयार करतात व शेतकऱ्यांनी तयार केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांपर्यंत स्वस्तात पोहोचावे या उद्देशाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सहा जून रोजी बियाणी महोत्सव आयोजित करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर वेलकम शेतकरी गो बॅक कंपनी हा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात राबवणार असल्याची देखील माहिती अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी बी म्हणून उपलब्ध करून देऊन वेलकम शेतकरी गो बॅक कंपनीच्या  धर्तीवर हा प्रयोग राज्यात प्रथम अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटले.

सन 2022- 23 या खरीप हंगाम नियोजनासाठी ची बैठक अकोला जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीसाठी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाधिकारी निमा अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू म्हणाले कि, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेहनतीने जिल्ह्यातील सर्वाधिक पेरणी होणारे सोयाबीन पिकाचे बियाणे घरच्याघरी तयार केले आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाचे देखील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

तसंच यावेळी बोलताना पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांना रासायनिक शेती कडून सेंद्रिय  व जैविक शेतीकडे वळण्याचे उद्युक्त करण्यासाठीचांगला व भक्कम पर्याय उभा करावा लागेल त्यासाठी हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन देखील बच्चू कडू यांनी केले.

 महत्वाच्या बातम्या                                           

नक्की वाचा:नोकरी देण्याची मानसिकता विकसित करा: राष्ट्रपती कोविंद

नक्की वाचा:Maharashtra Weather: 'या' जिल्ह्यात पाऊस आणि या ठिकाणी उष्णतेची लाट; वाचा महाराष्ट्रातील हवामान अंदाज

नक्की वाचा:युवा शेतकऱ्यांसाठी आयशर ट्रॅक्टर्सने लाँच केली प्राइमा G3 सीरीज; जागतिक दर्जाचे डिझाइन

English Summary: farmer welcome go back company experiment firstly apply in akola districtt
Published on: 11 May 2022, 02:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)