News

सध्या शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. अनेक शेतकरी हे अवकाळी पावसामुळे मेटाकुटीला आले आहेत. असे असताना अनेक शेतकरी हे सरकारच्या मदतीपासून वंचीत राहत आहेत. यामध्ये सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत.

Updated on 25 September, 2022 4:10 PM IST

सध्या शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. अनेक शेतकरी हे अवकाळी पावसामुळे मेटाकुटीला आले आहेत. असे असताना अनेक शेतकरी हे सरकारच्या मदतीपासून वंचीत राहत आहेत. यामध्ये सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत.

सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीकविमा द्यावा. वीजबिल माफ करावे, आदी मागण्यांसाठी दररोज विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. यामुळे वरखेडा (ता. सेनगाव) येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, (Abdul Sattar)आमदार तान्हाजी मुटकुळे (Tahnaji Mutkule)यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या आंदोलनाची शासकीय, प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही. सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे शुक्रवार पासून गोरेगाव तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी संप सुरू केला आहे. सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीकविमा द्यावा. वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

'स्वाभिमानी'ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, 'एफआरपी' साठी आंदोलन पेटणार..

या मागण्यांसाठी दररोज विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. यावेळी बालाजी महाराज शिंदे वरखेडकर, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, गजानन सावके, राधेश्याम कावरखे, गजानन सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, हिंगोली जिल्ह्याला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.

Rabbit : नोकरी सोडून तरुण करतोय ससे पालन, महिन्याला 90 हजारांचा नफा

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले होते. असे असताना मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदत मिळणार नाही. सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे.

महत्वाच्या बातम्या;
वीज बिल निम्म्याहून कमी येणार! फक्त 275 रुपयांचे हे उपकरण वीज मीटरजवळ ठेवा
शेतकऱ्यांनो खेकडा पालन आहे उत्तम व्यवसाय, कमी खर्चात मिळतोय लाखोंचा नफा
ब्रेकिंग! 1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरू होईल, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार सेवा सुरु

English Summary: Farmer protest: strike agriculture minister's symbolic effigy burnt
Published on: 25 September 2022, 04:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)