यावर्षी आपण पाहत आहोत की, अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न सध्या महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. जवळ जवळ कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आलाअसून देखीलप्रचंड प्रमाणात ऊस अजूनही शेतात उभा आहे.
या उसाचा कालावधी संपल्याने उसाला तुरे फुटले असून वजनात देखील घट होत आहे. त्यामुळे आपला ऊस तुटावा यासाठी शेतकरी प्रचंड प्रमाणात धडपड करीत आहेत. हा प्रश्न मिटावा यासाठी शेतकरीच नाही तर साखर कारखाने तसेच शासन देखील निरनिराळ्या उपायोजना योजत आहे. यामध्ये शेतकऱ्याकडे तोडणीसाठी मजूर, वाहन चालक इत्यादींकडून पैशांची देखील मागणी केली जात आहे. सगळ्या पार्श्वभूमीवर एवढा प्रचंड समस्यांमध्ये संपूर्ण उसाची तोड होणे म्हणजे खूपच दिव्य आहे असेच म्हणावे लागेल. याचं प्रत्यंतर औसा तालुक्यात आले.
शेतकऱ्याने काढले वाजत-गाजत मिरवणूक
याबाबतची सविस्तर माहिती अशी की औसा तालुक्यातील भादा या गावचे रहिवासी नामदेव नागोराव बनसोडे यांनी त्यांच्या शेतात दोन एकर ऊस लावला होता. परंतु त्यांच्या उसाची तोड होत नव्हते, त्यासाठी ते बऱ्याच दिवसापासून धावपळ करत होते ऊस तुटावा यासाठी प्रयत्न करत होते.
त्यांच्या नावाने ज्या कारखान्याचा शेअर्स आहे त्या कारखान्याकडून प्रयत्न करून देखील वेळेत ऊस जात नव्हता. त्यामुळे आपल्या शेतातील ऊस तुटावा यासाठी ते निरनिराळ्या गोष्टींचा शोध घेत होते. असे असताना तालुक्यातील साई शुगर या कारखान्याने त्यांच्या ओ ला हाक दिली. साई शुगर्स या खाजगी कारखान्याने त्यांना मदत करून त्यांच्या उसाची तोडणी सुरू झाली आणि दोनच दिवसात त्यांचा ऊस तोडणी चा प्रश्न मार्गी लागला व त्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला.बुधवारी दि. 13 तारखेला त्यांच्या उसाचे शेवटची खेप जाणार होती.
या पार्श्वभूमीवर सदर शेतकऱ्याने कारखान्याचे तसेच ऊसतोड मजुरांचे उपकार व्यक्त करण्यासाठी उत्सवच करण्याचे ठरवले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या उसाची शेवटची खेप घेऊन जाणाऱ्या वाहनाची सजावट केली. तसेच संबंधित वाहनाची व कामगारांची वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत गावातून तब्बल तीन ते चार तास मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. तसेच गावातील सगळ्या ग्रामदैवत यांना श्रीफळ देखील अर्पण करण्यात आले.
Published on: 16 April 2022, 01:03 IST