News

मागच्या वर्षी शास्त्रज्ञांनी नॅनो युरिया डेव्हलप केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचे नॅनो स्वरूपात वर्जन विकसित करीत आहेत.

Updated on 07 June, 2022 1:08 PM IST

 मागच्या वर्षी शास्त्रज्ञांनी नॅनो युरिया डेव्हलप केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचे नॅनो स्वरूपात वर्जन विकसित करीत आहेत.

यामध्ये नॅनो डीएपी, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर वर देखील काम सुरू असून या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे काम शास्त्रज्ञ करीत आहे. गुजरात राज्यातील कलोल या ठिकाणी नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये यावर विशेष काम सुरू असून शेतकऱ्यांना 50 किलोच्या बॅगेची उचल आणि चढ्या भावात तून बर्‍याच पैकी दिलासा मिळणार आहे.

नॅनो युरिया व्यतिरिक्त  नॅनो डीएपी या नॅनो बायोटेक्नॉलॉजी सेंटरमध्ये विकसित केले गेले असून त्याच्या क्षेत्रिय चाचण्या देखील जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व खत नियंत्रण आदेश यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर याचे उत्पादन सुरू होईल.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकांची खरेदी करतांना काळजी घ्यावी

अगदी कमीत कमी वाहतूक खर्चामुळे हे नॅनो खत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. नॅनो डीएपीची चाचणीसंपूर्ण देशातील एक हजार शंभर ठिकाणी जवळ जवळ 24 ते 25 पिकांवर  करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पारंपारिक डीएपीपेक्षा किती चांगले आहे हे तपासण्यासाठी विविध पिकांवर त्याची चाचणी घेण्यात आली असून नॅनो युरिया प्रमाणेच डीएपी आणि सूक्ष्मअन्नद्रव्यांचे परिणाम पाणी आले आहे.

नॅनो युरियाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करत असून डीएपी चा वापर देखील शेतकरी या पद्धतीनेच करतील अशी आशा कृषी क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.

नक्की वाचा:आत्ताच पाहा हे सोयाबीन पिकातील अन्नद्रव्याचे (खताचे व्यवस्थापन) वाचू शकतो तुमचा मोठा खर्च

 आता युरिया आणि डीएपी या दोन प्रमुख खतांची आता शेतकऱ्यांना फवारणी करावी लागणार आहे. नॅनो डीएपी, युरिया आणि नॅनो मायक्रो न्यूट्रीअंट्सच्या उत्पादनासाठी उत्पादन प्रकल्प आमला,फुलपुर,कलोल,बेंगलोर, कांडला, देवघर आणि गुवाहाटी येथे निर्माणाधीन आहेत. प्रकल्पामध्ये याचे उत्पादन सुरू होईल तेव्हा डीएपीची कमतरता भासणार नाही.

लोकांना होईल रोजगार उपलब्ध

 हे जे सर्व युनिटची उत्पादनक्षमता दोन लाख बाटल्यांचे आहे. या सर्व प्रकल्पांच्या स्थापनेसाठी एकूण तीन हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून त्यापैकी सातशे वीस कोटींची रक्कम आधीच वाटप करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमधून एक हजार लोकांना रोजगार मिळेल असा देखील दावा केला जात आहे. यापैकी नॅनो डीएपी, युरिया आणि कॉपर आणि सल्फर बोरॉनच्या बाटल्या सध्या गुजरातच्या कलोल युनिटमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तयार केले जातील.

नक्की वाचा:सोयाबीनची नविन आणि सुधारित पट्टापेर पेरणी पद्धत बघाच आणि उत्पन्न वाढवा

English Summary: farmer now get nano dap like as nano urea so farmer save expenditure to fertilizer
Published on: 07 June 2022, 01:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)